IMPIMP

BJP Vs Shivsena | भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर; ‘… त्यांच्याच कौतुकाच तुणतुणं वाजवत फिरायची शिवसेनेवर वेळ आली’

by nagesh
BJP Vs Shivsena | bjp leader keshav upadhye slams shiv sena over saamna editorial critize bjp fadnavis chandrakant patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  BJP Vs Shivsena | दसरा मेळाव्यात शिवसेनेनं विरोधकांवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर विरोधकांनी पलटवार केल्यानंतर आता सामनाच्या संपादकीयमधून सेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. कोणत्याही प्रश्नाला भाजप आणि केंद्र सरकार सामोरे जात नाही. उलट प्रश्न विचारणाऱयांना ते संपवून टाकतात. त्यांना लोकशाही, घटना, कायदा मान्य नाही. विरोधी पक्षाचे ते मुख्यमंत्री स्वीकारत नाही. राजकारणात आणलेला नवा पदरच खूप काही सांगून जात आहे. कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच असले त्यांना सुचत आहे. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण वाया गेले नाही. त्यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरून ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या बेताल बडबडण्यावरून त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे स्पष्ट होते असा टोलाही शिवसेनेने लगावला होता. दरम्यान, या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर (BJP Vs Shivsena) दिले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत.
ते म्हणाले, पडद्यामागची वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे.
विरोधी पक्ष म्हणून भाजपा राज्यातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडते म्हणून मूळ मुद्दा सोडून दुसरीकडे लक्ष विचलित करण्याची जुनी खोड आहे.
ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणं वाजवत फिरायची वेळ शिवसेनेवर आली आहे.
अशा शब्दात उपाध्ये यांनी टीका केली आहे. आणखी एक ट्विट त्यांनी केलं असून त्यामध्ये अभिमान आहे बाळासाहेबांचा ज्यांनी स्वत: महत्त्वाची पदं नाकारुन इतरांना मोठं केलं.
आज त्यांचेच चिरंजीव स्वत: शिवसैनिक आहेत असं सांगत मुख्यमंत्रिपद घेतात. मुलगा शिवसैनिक आहे असं सांगत त्याला पर्यावरण मंत्री बनवतात.
बरं मुख्यमंत्रिपदाला घेण्याला भाजपचा आक्षेप नाही. पण विश्वासघातकी मार्गानं ज्यांना लोकांनी सत्तेपासून दूर ठेवलं.
त्यांनाच सोबत घेऊन पदं मिळवणं याला मर्दानगी म्हणतात का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला (BJP Vs Shivsena) आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?

दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो. या मेळाव्यात पक्षप्रमुख आपले विचार मांडत असतात.
पक्षप्रमुखांचे दसरा मेळाव्यातील भाषण परंपरेप्रमाणे गाजले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री अशा दोन वेगळय़ा भूमिकेत आहेत.
ठाकरेंच्या जोरदार भाषणावर बेंबीच्या देठापासून भाजपने बोंब मारायला सुरुवात केली आहे.
फडणवीस यांनी तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे? अशी ‘अलोकशाही’ भूमिका घेऊन मनातली भडास बाहेर काढली.
उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असे सांगितले होते, पण ते स्वतःच झाले.
असा आक्षेप घेणारे फडणवीस (Devendra Fadnavis) किंवा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) कोण?

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

उद्धव ठाकरे हे एक शिवसैनिक आहेत. परकीय देशातील पक्षाचे ते काही सदस्य नाहीत.
कोणत्या परिस्थितीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याचा खुलासा शरद पवार यांनी केला आहे.
महाविकास आघाडीचे बहुमत आणि त्यांनी आपला नेता निवडला. शिवतीर्थावर लाखोंच्या उपस्थितीत वाजत गाजत उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.
लोक झोपेत आणि गुंगीत असताना लपून छपून, कडय़ाकुलुपात शपथ घेतली नाही.
हे काय राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना माहीत नाही? (BJP Vs Shivsena)

Web Title : BJP Vs Shivsena | bjp leader keshav upadhye slams shiv sena over saamna editorial critize bjp fadnavis chandrakant patil

हे देखील वाचा :

Chitra Wagh | ‘चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल’ – चित्रा वाघ यांचा राऊतांवर पलटवार

Pune Crime | MSEB च्या डी. पीमधून तांब्याची तार चोरणारे दोन जण गजाआड, 101 किलो तांबे जप्त

Babanrao Lonikar | ‘महाविकास आघाडीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात’

Related Posts