IMPIMP

कारमध्ये कोकिन घेऊन जात होती भाजपची युवा नेता, पोलीसांनी केली अटक

by amol
pamela goswami

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भाजपच्या युवा नेत्या पामेला गोस्वामी (Pamela Goswami) यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. ती आपल्या गाडीच्या आत कोकिन घेऊन जात होती. पोलिसांनी तिचा मित्र प्रबीर कुमार डे याला देखील न्यू अलीपूर भागात एनआर अव्हेन्यू येथून अटक केली. भाजपा युवा मोर्चाची पर्यवेक्षक आणि हुगळी जिल्ह्याची सरचिटणीस पामेला गोस्वामीला (Pamela Goswami) कोलकाताच्या न्यू अलीपूर येथून कोट्यावधी रुपयांच्या कोकिनसह अटक करण्यात आली.

भाजप नेता पामेलाच्या अंमली पदार्थांबद्दल पोलिसांना आधीच माहिती होती. तिचा निकटवर्तीय आणि भाजप नेता प्रबीर कुमार डे याला देखील अटक करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान न्यू अलिपूरमधील रस्त्यावर पोलिसांनी त्यांची गाडी थांबविली व शोध घेतला असता पामेलाच्या बॅग व कारमधून 100 ग्रॅम कोकेन जप्त केले. पकडलेल्या कोकिनची किंमत बाजारात सुमारे लाखो रुपये आहे. तिच्यासमवेत मध्यवर्ती सुरक्षा दलाचा सैनिकही होता, जो तिच्याा सुरक्षेसााठी तैनात होता. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Related Posts