IMPIMP

Pooja Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांची पुणे पोलिसांवर टीका, म्हणाल्या – ‘पोलीस निरीक्षक दीपक लगड हे बेजबाबदार अधिकारी’

by sikandershaikh
Sanjay Rathod | bjps dilemma shinde made sanjay rathore the minister who had fought with uddhav thackeray and resigned in case of puja chavan death

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (Pooja Chavan Suicide Case) राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. भाजपचा या प्रकरणी आधीपासूनच आक्रमक पवित्रा आहे. भाजपच्या महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पूजा चव्हाण राहत असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी पुणे वरिष्ठ पोलीस अधिकारी दीपक लगड यांच्याशी बाचाबाची झाली. यानंतर याबबात बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केला नाही, लगड हे अत्यंत बेजबाबदार अधिकारी आहेत, त्यांची हाकालपट्टी करावी अशी मागणीच त्यांनी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलीसांवर घणाघाती टीका करत आरोप केला.

काय म्हणाल्या चित्रा वाघ ?

चित्र वाघ म्हणाल्या, वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड हे बेजबाबदार आहेत. त्यांना हे प्रकरण रफदफा करण्यासाठीच तिथं बसवलं आहे. त्यांचा कुणीतरी मोठा बाप आहे तिथं. तो त्यांना सांगत असावा तू घाबरू नको. पोलीस निरीक्षक सांगत आहेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाहीत. परंतु पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case ) सोबत तिथं राहणाऱ्या 2 जणांचं काय ? ते पोलिसांच्या ताब्यात का नाहीत ? असे सवालही त्यांनी यावेळी बोलताना केले.

‘संजय राठोडला वाचवण्यासाठी कुठल्या थरापर्यंत जाणार आहात ?’

पुढं बोलताना वाघ म्हणाल्या, वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इतक्या रगेल पद्धतीनं वागले की, पोलीस महासंचालक देखील इतक्या सवंदेनशील प्रकरणात बोलत नाहीत. खुनी संजय राठोडला वाचवण्यासाठी कुठल्या थरापर्यंत जाणार आहात अशी टीकाही त्यांनी केली आहे.

‘ऑडिओ क्लीप, अरुण राठोड यांचं काय ? तो फोन संजय राठोडांचाच’

चित्र वाघ असंही म्हणाल्या, आई-वडिलांची तक्रार नाही म्हणून गुन्हा दाखल होत नाही.
परंतु ज्या 12 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या, त्याच्या चौकशीचं काय झालं.
अरुण राठोडला फोन केला होता त्याचं काय झालं. फोन संजय राठोड करत होते असा माझा आरोप आहे.

‘ही मोगलाई नाही, शिवशाही आहे हे कृतीतून दाखवून द्या’

वाघ म्हणतात, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणात पीडित मुलीनं तक्रार मागे घेतली होती.
परंतु या प्रकरणात सरकारनं गुन्हा का दाखल केला नाही.
त्या प्रकरणाचं नाव घेऊन तु्म्ही आवाज दाबणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही.
आम्हाला राज्याच्या संवेदनशिल मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, बलात्कारी आणि खुनी संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा.
आता महाराष्ट्रात मंत्रीच बायकापोरींवर अन्याय करत आहेत.
ही मोगलाई नाही, शिवशाही आहे हे कृतीतून दाखवून द्या अशी मागणी देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.

वाघ पुढं म्हणतात, जर इथं न्याय मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात जाण्याची आमची पुढची रणनीती असेल. हे प्रकरण घडलं तेव्हा गृहमंत्र्यांना कोरोना होता.
परंतु गृहराज्यमंत्री का नाही बोलले असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

Related Posts