IMPIMP

West Bengal Election : निवडणुकीपूर्वी भाजपची नवी खेळी; ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याचा पक्षप्रवेश ठरला !

by sikandershaikh
West Bengal Legislative Assembly Election 2021

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Legislative Assembly Election 2021) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी तृ्णमूल काँग्रेस (All India Trinamool Congress – TMC) विरुद्ध भाजप (Bharatiya Janata Party – BJP) अशी थेट लढत या निवडणुकीत होणार आहे. यात आता मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) भाजपच्या वाटेवर असल्याचं समजत आहे.

अभिनेते मिथुन चक्रवर्ती भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या 7 मार्च रोजी ते पश्चिम बंगालमध्ये भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी काही दिवसांपूर्वीच मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबई येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. मिथुन यांनी गेल्या वर्षी नागपुरात मोहन भागवत यांची भेट घेतली होती. त्यांनी भागवतांना घरी येण्याचं आमंत्रणही दिलं होतं. यानंतर आता मुंबईत जी भेट झाली ती बंगाल विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची असल्याचं मानलं जात आहे.

Related Posts