IMPIMP

BMC Election | भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात; शिवसेना नगरसेवकाचा दावा

by nagesh
BMC Election | from bjp 15 to 20 corporators-may join shivsena corporator Yashwant Jadhav

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  BMC Election | राज्याच्या काही जिल्ह्यातील महापालिका निवडणूक आगामी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election) रणधुमाळी त्याच महिन्यात आहे. या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाची मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे भाजपने (BJP) तर आगोदरच आपली तयारी सुरु केलीय. अशातच शिवसेना नेते (Shiv Sena) आणि नगरसेवक यशवंत जाधव (Corporator Yashwant Jadhav) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

लवकरच भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार असल्याचे नगरसेवक यशवंत जाधव यांनी म्हटले आहे. तर, मुंबईतील भाजप नगरसेवक (BMC Election) पक्षात नाराज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर, पालिकेतील भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट जाधव यांनी केला. डिसेंबर महिन्यात धमाका होणार असून, आम्ही सुद्धा ऑपरेशन करणार आहोत. असं यशवंत जाधव (Corporator Yashwant Jadhav) यांनी सांगितलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेबरोबरच भाजपच्या नगरसेवकांची संख्या देखील जास्त आहे.
विशेष म्हणजे मुंबईत सत्ता असणा-या शिवसेनेला काहीही करुन मागे टाकण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे.
महाविकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापन केल्याने सत्तेपासून भाजपला वंचित राहावे लागले.
दरम्यान, यंदा भाजपचं टार्गेट म्हणजे मुंबई महापालिका असणार आहे.

मात्र, शिवसेना नगरसेवक जाधव यांनी एक मोठा दावा केला आहे. भाजपाने किती मराठी उमेदवारांना उमेदवारी दिली आहे किंवा किती मराठींना उमेदवारी देणार आहेत? आता दिलेल्या आकडेवारीवरुन तुमच्या लक्षात येईल, त्यांचे किती नगरसेवक मराठी आहेत आणि किती नगरसेवकांना त्यांनी मराठी बोलायला शिकवलं आहे” अशीही टीका जाधव यांनी केली आहे.

Web Title: BMC Election | from bjp 15 to 20 corporators-may join shivsena corporator Yashwant Jadhav

हे देखील वाचा :

Atul Bhatkhalkar | ‘दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही’; भातखळकरांचा शरद पवारांना टोला

Aurangabad Crime | अखेर प्रा.डॉ. राजन शिंदेंच्या खुनाचं गूढ उकललं; कसं मारायचं याचा शोध घेतला Google वर!

Mumbai University | मुंबईतील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार

Related Posts