IMPIMP

Cabinet Expansion | ‘केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज’, काँग्रेसचा हल्लाबोल

by bali123
Nana Patole | nana patole reaction on pm narendra modi mumbai visit

नागपुर न्यूज (Nagpur News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) केंद्रातील मोदी सरकारने मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) केला आहे. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet Expansion) भाष्य केले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची महागाई वाढली आहे. नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसने आज राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला. नागपुरात (Nagpur) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सायकल यात्रा काढण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

मोदी सरकारने कृत्रिम महागाई केली

नाना पटोले म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने (Modi government) कृत्रिम महागाई निर्माण करुन सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. या सामान्य माणसाच्या वेदना दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस (Congress) पक्ष मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे.

जुलमी, अत्याचारी सरकार

केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे जुलमी, अत्याचारी सरकारमुळे जगणे मुश्कील झाले आहे.
शेजारच्या देशात भारत 30 रुपयांनी पेट्रोल व 22 रुपयांनी डिझेल देते.
आणि आपल्याच लोकांना 100 रुपयांना का ? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.
हे अन्यायी मोदी सरकार उखडून फेकण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन सामान्य जनतेसाठी संघर्ष करत असल्याचे पटोले यांनी म्हटले.

Web Titel : Cabinet Expansion | need to change not only union minister but also prime minister criticism of nana patole

Related Posts