IMPIMP

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

by Team Deccan Express
campaigning for pandharpur mangalweda bypoll concludes

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. असे असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवून होत असलेल्या पंढरपूर pandharpur – मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा गुरुवारी (दि. 15) सांयकाळी थंडावल्या. महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून हजारोंच्या सभा घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने प्रचाराचा धुराळा उडविला होता. मात्र गुरुवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपने एकही प्रचारसभा घेतली नाही. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पंढरपुरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवेढ्यात प्रचारसभा झाली. या पोटनिवडणूकीसाठी उद्या (दि. 17) मतदान होत असून 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

‘अजित पवार सत्तेसाठी हपापलेले, जास्त गमजा मारू नका, कालचक्र फिरत असतं’; चंद्रकांत पाटलांचा टोला

पंढरपुरात pandharpur भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीची सर्व सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे होती. तर भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीही मोठी ताकद उभी केली होती. तरीही ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी सोपी नसून येथे अतिशय अटीतटीची लढाई होणार असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांचा मोठा फटका बसणार असल्याचे दिसत आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी व इतर काही छोट्या पक्षांचाही फटका बसेल. भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांना त्यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे हे अडचणीचे ठरणार आहेत. या सर्व समीरकरणांत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना वडिलांच्या निधनाची सहानुभूती मिळणार असेही चित्र आहे. येथे शनिवारी (दि. 17) मतदान होत आहे. त्यामुळे आता अजित पवार व जयंत पाटील यांनी उभी केलेली ताकद सरस ठरणार की देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी उभी केलेली ताकद सरस ठरणार हे 2 मे रोजी निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts