IMPIMP

अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी

by pranjalishirish
cbi has summoned former maharashtra home minister anil deshmukh 14th april

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh  यांना सोमवारी (दि.12) सीबीआयकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार अनिल देशमुख यांची बुधवारी (दि.14) चौकशी होणार आहे. यापूर्वी अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकांची सीबीआयकडून रविवारी (दि.11) चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनाही सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे.

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

सर्वोच्च न्यायालयाने देशमुख Anil Deshmukh यांच्याविरोधातील सीबीआयची प्राथमिक चौकशी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने 15 दिवसांमध्ये सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सीबीआयने चौकशी सुरु केली आहे. सीबीआयने रविवारी देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व सहाय्यक एस. कुंदन यांची कसून चौकशी केली होती. या दोघांची तब्बल चार तास चौकशी करुन स्वतंत्र जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना सीबीआयने समन्स बजावले आहे.

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात सीबीआय सहा दिवसांपासून चौकशी करत आहे. आणखी आठ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी पूर्ण करुन त्यांना न्यायालयात अहवाल सादर करायचा आहे. त्यामुळे हे प्रकरण अनिल देशमुख यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आतापर्यंत परमबीर सिंह, मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त राजू भूजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील तसेच एनआयएच्या अटकेतील सचिन वाझेची चौकशी करण्यात आली आहे.

Read More : 

देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर घणाघात, केला ठाकरे सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप

पंढरपूर पोटनिवडणूक : ‘तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी’, सदाभाऊंचा जयंत पाटलांना टोला

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

‘प्राण जाये पर वचन न जाये’, असं उद्धव ठाकरेंचं कार्य’, मुख्यमंत्र्यांची पाठराखण

..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

Related Posts