IMPIMP

Jayant Patil : ‘….म्हणून राज्यात अधिवेशन घेत नाही’

by sikandar141
Jayant Patil | ncp maharashtra president jayant patil admitted in breach candy hospital mumbai he leave cabinet meeting and went to hospital

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहून केंद्रात अधिवेशन(Convention) रद्द करण्यात आले आहे. राज्य सरकार अधिवेशन(Convention) का घेत नाही, याचे कारण जगजाहीर आहे. राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात. पण केंद्राचा नियम हा प्रत्येक राज्यालाही लागू होतो. त्यामुळे महाराष्ट्रतही अधिवेशन होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यात साखर कारखान्याच्या संदर्भात झालेल्या बैठकीत मंत्री जयंत पाटील विविध विषयांवर बोलत होते. लॉकडाऊन वाढवण्याबाबत 2 दिवस परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री निर्णय घेतील असे पाटील म्हणाले. राज्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत आहे. पॉझिटिव्हीटी रेटही खाली गेले आहेत. पण हा रेट पूर्णपणे कमी होत नाही. तोपर्यंत संकट अजून टळले असे म्हणता येणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाला नाही.

तर काही ठिकाणी मृत्यदरातही घट होत नाही. त्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्याची रणनीती ही वेगळीच असणार आहे. कोरोना संदर्भात ऑक्सिजन, औषधे, बेड आदी गोष्टीचा विचार करावा लागेल. त्यांची कमतरता भासणार नाही याकडे सरकार अधिक लक्ष देणार आहे. या सर्व गोष्टी पाहून लॉकडाऊनचा विचार केला जाईल, अशी भूमिका पाटील यांनी मांडली आहे.

READ ALSO THIS :

Pune : ‘गजा मारणेची मिरवणूक आम्हीच काढली’, दमदाटी करुन पैसे मागणारा खासगी सावकार गजाआड

गरज असेल, तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल : मुंबई हाय कोर्ट

Video : जालन्यात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍याला पोलिसांकडून बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं प्रचंड खळबळ

बाल लैंगिक आत्याचार प्रकरण : माजी वरिष्ठ सनदी अधिकारी मारूती सावंतांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला; जाणून घ्या संपुर्ण Case

Related Posts