IMPIMP

Uddhav Thackeray : ‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, पावसाळ्यात सर्वाधिक काळजी घ्या’ (Video)

by nagesh
chance third wave corona be most careful rain chief minister uddhav thackeray appeal

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात थैमान घातलेलली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी आता तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबियांची काळजी घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी केले आहे. पावसाळा येतोय या काळात सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे. राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनावरील उपचारांबाबत आता औषधांचा अतिवापर देखील घातक ठरत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे औषधांचा अनाठायी वापर आपण टाळायला हवा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray शनिवारी (दि. 29) मुंबईत महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलच्या ऑनलाइन कार्यशाळेच्या उदघटनप्रसंगी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोना आजाराबाबत आता अधिक सतर्क राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. कोरोना हा आजार अजिबात अंगावर काढू नका. हा आजार इतर आजारांसारखा नाही. वेळीच उपचार घ्या अन डॉक्टरांच्या सल्लाशिवाय कोणतेही औषध घेऊ नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच राज्यात आता कोरोनानंतर बुरशीजन्य रोगाचा प्रसार वाढतो आहे. यामागे औषधांचा अतिवापर हे महत्वाचे कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असे व्हायला नको. बुरशीजन्य आजारांवर देखील आता उपचारपद्धती निश्चित व्हायला हवी, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Also Read :

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

गरज असेल, तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल : मुंबई हाय कोर्ट

Related Posts