IMPIMP

Chandrakant Patil | ‘राष्ट्रपती राजवट स्विकारुन कारभार केंद्राकडे द्या’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil demands president rule in state maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil | ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरुन (OBC political reservation) राज्यात गदारोळ माजला आहे. या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहेत. यातच केंद्र सरकारच्या ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतच्या भूमिकेवरुन काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी टीका केली होती. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पलटवार केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, ‘राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायचा असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट स्वीकारावी, असं आव्हानच पाटील यांनी अशोक चव्हाण यांना दिलं आहे. तसेच, ओबीसी राजकीय आरक्षण गमावण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारची ढिलाई आणि बेपर्वाई कारणीभूत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसी राजकीय आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट पूर्ण करणे आणि त्यासाठी मुळात एंपिरिकल डेटा (Empirical data) गोळा करण्यास सांगितले असताना त्यासाठी महाविकास आघाडीने अजूनही काही प्रभावी पावले टाकलेली नाहीत. तर, मार्च 2021 मध्ये न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही आघाडी सरकारने ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा केला असता तर आतापर्यंत हा प्रश्न सुटला असता. परंतु, आपण काहीही करायचे नाही आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारवर (Central Government) जबाबदारी ढकलायची असे आघाडी सरकारचे धोरण असल्याची टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘कोरोना महासाथ, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण अशा प्रत्येक महत्त्वाच्या विषयात
आघाडी सरकार स्वतः काही जबाबदारी पार पाडायचे टाळून केवळ केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहे.
राज्यातील प्रश्न सोडविण्याची मुख्य जबाबदारी आघाडी सरकारची असताना त्यासाठी कोणताही पुढाकार घेताना आघाडी सरकार दिसत नाही.

Web Title :- Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil demands president rule in state maharashtra

हे देखील वाचा :

BJP MLA Gopichand Padalkar | ‘अजित पवारांना मुख्यमंत्री केले, तर 4 दिवसांत राज्य विकतील’

Tiger Shroff | ‘गणपथ’च्या शूटिंगदरम्यान टायगर श्रॉफच्या डोळ्याला दुखापत, अभिनेत्याने शेअर केला फोटो

Pune Crime | पुण्यात मुंढवा पोलिसांकडून गावठी पिस्टल अन् जिवंत काडतुसे बाळगणार्‍या दोघांना अटक, अग्नीशस्त्रे जप्त

Related Posts