IMPIMP

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी घेतली पंकजा मुंडेंची भेट; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा

by bali123
Chandrakant Patil | bjp state president chandrakant patil meet pankaja munde at worli

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Chandrakant Patil | मागील काही दिवसासापूर्वी केंद्रातील मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) पार पडला. मात्र भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे (MP Dr. Pritam Munde) यांना त्यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यावरून मुंडे समर्थक एकवटले. आणि आक्रमक होत त्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नाराज असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची मंगळवारी भेट घेतली आहे. वरळीतील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात संध्याकाळी भेट झाली. मात्र या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यावेळी पंकजा मुंडेंची (Pankaja Munde) नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, या भेटीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘मंगळवारी संध्याकाळी ही भेट झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एकाच पक्षातील 2 नेत्यांची भेट होणं स्वाभाविक आहे. यात वेगळं असं काहीच नाही. त्याचबरोबर ही भेट गुप्त नाही तर उघडपणे सर्वां समोर झाली आहे. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

या दरम्यान, ज्यावेळी मुंडे समर्थकांनी राजीनामा दिले होते. त्यावेळी पंकजा मुंडेंनी (Pankaja
Munde) समर्थकांशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी भावनिक आवाहन करत आणि
कार्यकर्त्यांना आपले राजीनामे परत घेण्यास सांगितलं होतं. दरम्यान, त्यानंतर भाजपने आयोजित
केलेल्या ओबीसी आरक्षणाच्या बैठकीला देखील पंकजा मुंडे गैरहजर होत्या. यावरून चंद्रकांत
पाटील (Chandrakant Patil) मुंडे यांची नाराजी दूर करायला आलेत अशी चर्चा रंगली आहे.

Web Titel : Chandrakant Patil | bjp state president chandrakant patil meet pankaja munde at worli

Related Posts

Leave a Comment