IMPIMP

Chandrakant Patil । अजित पवार, अनिल परब यांची CBI चौकशी करा; चंद्रकांत पाटलांचं थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

by bali123
chandrakant patil | cbi inquiry into ajit pawar anil parab chandrakant patils letter to amit shah

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil |  राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) नेते आणि मंत्र्यांची सक्तवसुली संचालनालय (ED) कडून चौकशी सुरु आहे. सक्तवसुली संचालनालय (ED) आणि सीबीआय (CBI) या दोन्ही तपास संस्थांवरून राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकास भिडले आहेत. तर आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांची चौकशी देखील सुरूय. यामध्येच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट केंदीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्याकडे केली आहे. पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्राद्वारे ही मागणी केलीय. chandrakant patil | cbi inquiry into ajit pawar anil parab chandrakant patils letter to amit shah

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात सध्या बरखास्त करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या पत्रामध्ये वसुलीचे गंभीर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करावी, अशी प्रदेश भाजपची (BJP) मागणी असल्याचं त्यात म्हटलं आहे. अशा पद्धतीचं पत्र चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे.
अशा भाजपच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रदेश भाजपच्या 1 कोटी 10 लाख सदस्यांतर्फे आपण मागणी करत असल्याचा दावा केला आहे.
या दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यसमितीकडून या दोन्ही मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
मात्र, आता चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवत सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे.
तसेच, याअगोदर देखील भाजपच्या (BJP) कार्यकारिणी बैठकीमध्ये अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीबाबत ठराव मांडला गेला होता.
भाजपच्या या भूमिकेमुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

Web Title : chandrakant patil | cbi inquiry into ajit pawar anil parab chandrakant patils letter to amit shah

Related Posts