IMPIMP

Chandrakant Patil | ‘स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्यांना जनतेचा आवाजच ऐकू येत नाही’

by nagesh
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil free mhada houses for mla maharashtra Thackeray government Jitendra Awhad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Chandrakant Patil | साकीनाका येथील बलात्काराच्या (Saki Naka Rape Case) घटनेनंतर राज्यात महिला अत्याचाराच्या घटना एका मागोमाग एक समोर येत आहेत. डोंबिवली, कल्याण नंतर आता महाबळेश्वरमध्येही (Mahabaleshwar) अशीच घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्यावरुन भाजप (BJP) कमालीचा आक्रमक झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ट्विटरवर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, कल्याणमध्ये अवघ्या 8 वर्षाच्या मुलीवर तर महाबळेश्वरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माझे एकच सांगणे आहे.
ही वेळ गायब होण्याची नव्हे, तर अत्याचाराचे हे दृष्टचक्र थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची आहे.

आपल्या माता-भगिनींवर ही वेळ ओढवलेली असताना कुठला कुटुंबप्रमुख इतर राज्यांमधली परिस्थिती दाखवेल ? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
स्वत:ला महराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या दीड वर्षापासून दुर्दैवाने जनतेचा आवाजच ऐकू येत नाही,
असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, आज महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) काही नेत्यांवर अशाच
प्रकरणांमध्ये गुन्हे (FIR) दाखल आहेत. अशावेळी या सरकारकडून, विशेषत: गृहमंत्र्यांकडून ठोस पाऊले उचलण्यासाठी दाखवला जाणारा
हा निष्काळजीपणा म्हणजे गुन्हेगारांना दिलेले प्रोत्साहन समजावे का ? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Web Title : Chandrakant Patil | chandrakant patil criticizes cm uddhav thackeray over crime against women state

हे देखील वाचा :

Varsha Gaikwad | शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू ! पालकांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी; सूचनांबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…

Rain in Maharashtra | राज्यात आगामी 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

Pune Crime | पुण्यात दुधामध्ये भेसळ ! अन्न औषध प्रशासनाकडून FIR दाखल

Related Posts