IMPIMP

Chandrakant Patil | ‘उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे सोपवावी’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
Chandrakant Patil | CM uddhav thackeray should hand over responsibility cm post another bjp chandrakant patil

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या मुद्द्यावरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”राज्याला गेले 70 दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. कोरोनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत देशव्यापी बैठकीत मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सलाही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन-अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलीय. त्यामुळे तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अन्य नेत्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली पाहिजे,” अशी मागणी पाटील यांनी केली. त्यावेळी ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”राज्यात कोरोनाची तिसरी लाट आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा वेळी निर्णय घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नाहीत. संकटाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वतीने कोणी मुख्यमंत्री म्हणून काम करावे हे ठरविण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपण मुख्यमंत्र्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो पण तब्येत बरी होईपर्यंत त्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा,” असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांना टोला..
”मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते गेले सत्तर दिवस कोणालाही उपलब्ध नाहीत.
एसटीचा संप चालू असून सत्तर पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
सरकारी भरतीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटत आहेत. निराशेमुळे तरुणांच्या आत्महत्या होत आहेत.
शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता नाही.
त्यांना विमा मिळत नाही आणि नुकसान भरपाईही मिळत नाही, असं असूनही महाराष्ट्राची परिस्थिती चांगली आहे असं संजय राऊत (Sanjay Raut) यांना वाटत असेल तर ठीक आहे,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी चिमटा काढला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :  Chandrakant Patil | CM uddhav thackeray should hand over responsibility cm post another bjp chandrakant patil

हे देखील वाचा :

Pune News | बस चालवताना चालकाला आली फिट; प्रसंगावधान दाखवत पुण्यातील महिलेनं घेतलं स्टेअरिंग हाती

Uddhav Thackeray | ‘प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray | ‘अजित पवार यांच्यावर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवा’; ‘या’ नेत्याची मागणी

Related Posts