IMPIMP

Chandrakant Patil | मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ माणूस ‘ईडी’च्या रडारवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सांगितलं नाव

by bali123
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil free mhada houses for mla maharashtra Thackeray government Jitendra Awhad

नाशिक न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) काही नेते, मंत्री विविध प्रकरणामुळे सक्तवसुली  संचालनालयाच्या (enforcement directorate) ED रडारवर आहेत. यावरून भाजप सातत्याने राज्य सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहे. तर सध्या तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (former home minister anil deshmukh) , राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांची विविध प्रकरणामध्ये चौकशी सुरूय. यातच आता शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या बंगल्याची ED कडून चौकशी सुरू असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलीय. तर, मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असून त्याची चौकशी सुरू असल्याचं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

चंद्रकांत पाटील हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमाशी सवांद साधला. त्यावेळी आज रात्री एका बड्या नेत्याला अटक होऊ शकते, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या विधानावरून त्यांना सवाल केला असता, त्यावेळी ते म्हणाले, ‘अनेकांच्या चौकशा सुरू आहेत. अजित पवार (Ajit Pawar) व अनिल परब (Anil Parab) यांची CBI चौकशी व्हावी म्हणून कोर्टात याचिका करण्यात आलीय. नितीन राऊत यांनाही एका प्रकरणात कोर्टानं फटकारलं आहे. संजय राठोड यांचेही प्रकरण प्रलंबित आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या निमित्तानं अन्य कारखान्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी मी स्वत: केलीय. याआधी अण्णा हजारेंनीही अशी मागणी केलीय. अनिल देशमुख यांची मालमत्ता ED ने सील केलीय. हे सगळं सुरू असल्यानं एका नेत्याला अटक होईल. असं त्यांनी म्हटलं. तसेच, ‘मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांची चौकशी सुरूय असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यांनतर माध्यमांनी ‘देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या (Union Home Minister Amit Shah) भेटीसाठी दिल्लीला गेलेत असा सवाल चंद्रकांत पाटील यांना केल्यानंतर त्यावर पाटील म्हणाले, ‘ ‘ही नियमित भेट आहे. त्यात नवीन काही नाही. सहकार या विषयावर काही चर्चा झालीय असं वाटत नाही. मात्र, राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप देखील पाटील यांनी केलाय. ‘मोठे अधिकारीच घोटाळ्यात अडकल्यानं कोणाचा कोणावर वचक राहिलेला नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Web Title : Chandrakant Patil | cm uddhav thackerays pa milind narvekar on ed radar says bjp leader chandrakant patil

Related Posts