IMPIMP

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची खरमरीत टीका, म्हणाले – ‘पवारसाहेब आम्ही पीत नाही, तुम्हीच वाईन अन् दारूमधला फरक समजावून सांगा’

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar the type of backbiting is not right but sharad pawar told chandrakant patil

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनकिराणा दुकानांमध्ये वाईन (Wine) उपलब्ध करण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारवर (Maharashtra Government) टीकेची झोड उठू लागली आहे. त्यातच काही गावांनी या निर्णयाविरोधात ग्रामसभेत ठराव घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी वाईनवरून सरकारवर टीका केलीच पण राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही उपहासात्मक टोला लगावला आहे. मुंबईत (Mumbai) पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, मद्यपान (Alcoholism) आपण कधी करत नाही त्यामुळे वाईन आणि दारूमधील फरक समजत नाही. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच तो समजून द्यावा. राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध झाल्याने शरद पवार यांना दु:ख झालं आहे. पण ज्यावेळी गावोगाव या निर्णयाच्या विरोधात महिला रस्त्यावर उतरल्यानंतर पवारांना खरे दु:ख होईल, असेही ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, वाईन म्हणजे दारू नाही असं सांगण्याचा तमाशा सुरु आहे. म्हणजे आता छाप्यात गांजा सापडला की त्याला हर्बल तंबाखू (Herbal Tobacco) म्हणायचे का ? असा सवाल उपस्थित करत वाईन म्हणजे दारू (Alcohol) नव्हे असे समर्थन चालू आहे. मुळात वाईन हि जर दारू नसेल तर दारूच्या दुकानावर वाईन शॉप (Wine Shop) असा फलक लावू नका. त्याच्या जागी अमृत शॉप, नीरा शॉप असे काहीही म्हणा. काही लोकांच्या भल्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून दाखवताना तो मात्र शेतकऱ्यांसाठी (Farmers) असल्याचा दाखवला जातो. खरंच जर शेतकऱ्यांसाठी भलं करायचं असेल तर गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी आपण काय केले ते सांगा. अजूनही नैसर्गिक आपत्तीची (Natural Disaster) नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण नाही, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाले नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.

राज्य सरकारने किराणा मालाच्या (Groceries) दुकानात वाईन उपलब्ध करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यावर जनतेत रोष आहे.
ग्रामीण भागातील महिला याला विरोध करत आहेत.
ज्यावेळी गावातील महिला रस्त्यावर उतरून या निर्णयाविरोधात आंदोलन करतील त्यावेळी शरद पवार यांना दु:ख होईल.
सरकारने जनतेच्या संयमाची परीक्षा घेऊ नये.
पेट्रोल डिझेलवरील कर कमी (Petrol Diesel Tax Reduction) करून मोदी सरकारने (Modi Government) दिलासा दिला.
त्यानंतर 22 राज्यांनी व्हॅट (VAT) कमी करून जनतेला अधिक दिलासा दिला.
पण महाराष्ट्रातील सरकारने (Government of Maharashtra) इंधनावरील व्हॅट कमी केलेला नाही.
त्यामुळे मोठे आंदोलन (Alligation) झाल्यावरच सरकारला जाग येणार का ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, किराणा दुकान व सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध करण्याचा सरकारने निर्णय घेतला असला तरी सर्वच दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली नाही.
ज्या सुपरमार्केटचे (Supermarket) आकारमान 1 हजारपेक्षा जास्त आहे.
अशा सुपरमार्केट आणि ‘वॉक इन स्टोअर’ (Walk in Store) मध्ये वाईनची विक्री करण्यास परवानगी आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरकारने सांगितले असून गेल्या 10 वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे.

Web Title :- Chandrakant Patil | explain the difference between wine and liquor bjp leader chandrakant patil criticism on sharad pawar on allowing supermarket wine sale

हे देखील वाचा :

Satara Crime | दुर्दैवी ! बोलेरोची दुचाकीला समोरून धडक, बापलेकाचा मृत्यू

Anil Deshmukh-Anil Parab | ‘पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी अनिल देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?’

Jalgaon Crime | ओढणीने गळफास घेऊन 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

Amravati Crime | ‘कोरोना’ चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याप्रकरणी लॅब टेक्निशियनला 10 वर्षे कारावास

Related Posts