IMPIMP

Chandrakant Patil | ‘संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय’ – चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)

by nagesh
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil on shivsena leader and mp sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Chandrakant Patil | शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकतंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याबद्दल एक विधान केलं होतं. चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आलंय. म्हणून त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असं म्हटलं असावं. अशा शब्दात टोला संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला होता. यावरुन आता चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) विधानावरुन चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्यत्तर दिलं आहे. संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय, अशा विनोदी शैलीत चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्यांना थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षच केलं आहे. त्यामुळे या दोन दिग्गज राजकीय नेत्यांमधील टोलेशाही विनोदाचा भाग झाली आहे. तसेच, संजय राऊतांना कोणी फार गंभीरतेनं घेत नाही, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते राऊत?

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, “चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. चंद्रकांतदादा हे अवतारी पुरूष आहेत. चमत्कारी पुरूष आहेत. ते काहीतरी नक्कीच चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्याची त्यांची वेदना मी समजू शकतो. पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं मला कळालं आहे. त्यामुळे त्यांना माजी मंत्री म्हणून घ्यायचं नसेल, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं.

Web Title : Chandrakant Patil | i know sanjay raut will be sent us president chandrakant patil raut

हे देखील वाचा :

Raosaheb Danve | युती झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी चालतील का?; रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

FIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल

Anil Deshmukh | ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचे नाव नाही?; सचिन वाझेसह 14 आरोपी

Mumbai Crime | वयोवृद्ध आईवडिलांची छळवणूक ! मुलाला 10 दिवसात अलिशान घर सोडण्याचे कोर्टाचे निर्देश

Related Posts