IMPIMP

Chandrakant Patil | राष्ट्रवादीच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण, म्हणाले – ‘शरद पवार यांनी केलेल्या टीकेमुळे हे छापे…’

by nagesh
Chandrakant Patil | income tax department raids due to criticism made by sharad pawar chandrakant patils explanation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Chandrakant Patil | लखीमपुर खीरी (lakhimpur kheri) येथे अंगावर जीप घालून 6 शेतकर्‍यांची हत्या करण्यात आल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. या हत्याकांडाची तुलना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी जालीयनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरांवर आणि ठिकाणांवर प्राप्तीकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकार्‍यांनी छापेमारी केली. शरद पवार यांनी टीका केल्यानेच प्राप्तीकरचे छापे पडले, असा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे. आता यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

भाजपासोबत संबंध जोडणे हास्यास्पद

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या घरे किंवा कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यांचा संबंध भाजपासोबत जोडणे हास्यास्पद आहे. लखीमपूर खीरी प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेमुळे हे छापे मारण्यात आल्याचा दावा म्हणजे मोठाच विनोद आहे.

6 महिने माहिती जमवल्यानंतर कारवाई

चंद्रकांत पाटील म्हणाले, काल राज्यातील विविध ठिकाणी प्राप्तीकर खात्याने छापे मारले.
6 महिने माहिती जमवल्यानंतर या खात्याने कारवाई केल्याचे प्राप्तीकर विभागाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
अशा स्थितीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या लखीमपूर खिरी प्रकरणाबाबत शरद पवार यांनी खंबीर भूमिका घेतली म्हणून छापे टाकले असे म्हणणे हा मोठाच विनोद आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

1-2 दिवसांत अशी कारवाई होत नाही

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, राज्यातील 25 निवासस्थाने आणि 15 कार्यालयांवरील छाप्याची कारवाई ही 1-2 दिवसांत तयारी करून होऊ शकत नाही.
प्राप्तीकर विभागाने यासाठी मोठी तयारी केली असावी, हे या कारवाईच्या व्यापकतेवरून दिसते.

राजकीय रंग देणे हास्यास्पद

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्राप्तीकर विभाग ही स्वतंत्र केंद्रीय यंत्रणा असून ती कायद्याच्या चौकटीत काम करते.
प्राप्तीकर विभागाने काही आर्थिक व्यवहार उघडकीस आणले तर त्याला कायदेशीर पद्धतीनेच उत्तर दिले पाहिजे.
अशा छाप्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी जोडून राजकीय रंग देणे, आणि स्वतःला निर्दोष ठरविणे हास्यास्पद आहे.

Web Title : Chandrakant Patil | income tax department raids due to criticism made by sharad pawar chandrakant patils explanation

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे सीआयडीकडून फरारी अ‍ॅड. सागर सुर्यवंशीला अटक, शुक्रवार पेठेतील रेणुका माता मंदिराजवळ वेषांतर करून कारवाई

Pune Police Crime Branch | 7 वर्षे फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

IPS Transfer Maharashtra | हरीश बैजल सोलापूरचे नवे पोलिस आयुक्त ! पुण्याच्या गुन्हे शाखेत अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे यांची नियुक्ती

Related Posts