IMPIMP

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

by pranjalishirish
 Hasan Mushrif ED Raid | NCP leader hasan mushrif first reaction after ed raid on house in kagal

कोल्हापूर : ‘देवेंद्र फडणवीस यांना भविष्यात राज्यसभेत पाठवले जाणार आहे. चंद्रकांत पाटील हे भविष्यात देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातूनही निवडणूक लढवू शकतात. चंद्रकांत पाटील यांना आयत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सवय आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ Hasan Mushrif  यांनी केली आहे.

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

भाजपचे मीडिया सेल प्रमुख नवीन जिंदाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवर निशाणा साधण्यात आला. जिंदाल यांच्या या वक्तव्यावरून भाजपच्या नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली जात होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर मुश्रीफ Hasan Mushrif  यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

तसेच चंद्रकांत पाटील हे आयत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात. त्यावरही मुश्रीफ Hasan Mushrif यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘चंद्रकांत पाटलांना आयत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सवयच आहे. मी विधानसभा निवडणुकीत पाचवेळा निवडून आलो. अनेक वर्षे मंत्रिपदही भूषवले. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून जीवाला जीव देणारी माणसं तयार करावी लागतात. पण चंद्रकांत पाटील यांना आयत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सवयच आहे. त्यामुळे भविष्यात देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेत पाठवले जाणार आहे. त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढणार आहेत. नागपूरमध्ये नितीन गडकरी असल्याने चंद्रकांत पाटील यांना लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळणार नाही, अशा चर्चा आहेत, असेही ते म्हणाले.

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

दरम्यान, जिंदाल यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानावर भाजपने माफी मागावी एवढेच मी म्हटले होते. मी आमच्या पक्षाचा एजंट आहे, पवारसाहेबांवर टीका केल्यानंतर गप्प बसू का?, चंद्रकांत पाटील यांना चोमडेपणा करायला कोणी सांगितला होता?, अशा शब्दांत टीका केली.

Also Read :

राहुल गांधींनी ‘या’ 2 शब्दांत साधला निवडणूक आयोगावर निशाणा

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक; 5 शहीद, 21 जण बेपत्ता

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले

Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)

फडणवीसांचा CM ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास; मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केलं तेच समजलं नाही’

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Related Posts