IMPIMP

Chandrakant Patil On Uddhav Thackeray | चंद्रकांत पाटलांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र म्हणाले – ‘…तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरण्याचा अधिकार नाही’

by nagesh
Chandrakant Patil On Uddhav Thackeray | BJP Leader Chandrakant Patil On Shivsena Chief and CM Uddhav Thackeray

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – Chandrakant Patil On Uddhav Thackeray | संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत मोठी भूमिका मांडत राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections) लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यावेळी शिवसेनेने (Shivsane) म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही, असं ते म्हणाले. आपण कुणापुढे झुकून लढणार नाही असं म्हणत त्यांनी राज्यसभा खासदारकी लढवणार नसल्याचं सांगितलं. यानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चा होत आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

”राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला. शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचे छत्रपती संभाजीराजे सांगताहेत. शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल ? संभाजीराजेही खोटं बोलताहेत ? त्यांचा फोनही न घेणं कुठल्या सभ्यतेत बसतं ?” असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवरुन टोला लगावला आहे. याबाबत पाटील यांनी ट्विट केलं आहे.

”शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन खरं – खोटं करण्याचं संभाजीराजेंचं आव्हान उद्धवजींनी स्वीकारावं. मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल तरी. महाराजांच्या वंशजांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायचा नैतिक अधिकारही नाही ! शोधा एखादं तथाकथित सेक्युलर नाव…,” अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

Web Title :- Chandrakant Patil On Uddhav Thackeray | BJP Leader Chandrakant Patil On Shivsena Chief and CM Uddhav Thackeray

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune RTO Close New Rickshaw Permit | पुणे RTO चा मोठा निर्णय ! नवीन रिक्षा परवाने बंद होणार

Maharashtra Police Recruitment 2022 | राज्यातील 7 हजार पदांची पोलीस भरती कधी होणार ? गृहमंत्र्यांनी जाहिर केली ‘तारीख’, जाणून घ्या

Aadhaar Card | तुमचं ‘आधार कार्ड’ बनावट तर नाही ना ?; कसं ओळखाल ? जाणून घ्या सोप्या टिप्स

Maharashtra Govt Job Vacant Seats | राज्यात तब्बल दोन लाख 44 हजार सरकारी पदे रिक्त; माहिती अधिकारातून आकडेवारी समोर

Ajit Pawar | उद्घाटनाला पोहोचताच अजित पवारांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी; म्हणाले – ‘मला बोलावताना विचार करा, मी तुमचा…’ (व्हिडीओ)

Related Posts