IMPIMP

चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला Lockdown वर सुचवला ‘उपाय’, म्हणाले ; ‘लॉकडाऊनऐवजी…’

by pranjalishirish
Chandrakant Patil suggests 'solution' to Thackeray government on lockdown; Said; 'Instead of lockdown ...'

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  यांनी लॉकडाऊनबाबत भाष्य केले.

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याच्या दृष्टीने घडामोडी सुरु आहेत. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवत म्हटले, की ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लॉकडाऊन हा एकच पर्याय नाही. त्यापेक्षा आरोग्य यंत्रणेसाठी पायाभूत सुविधा वाढविणे आणि प्रभावी उपाययोजानांवर अधिकाधिक भर द्यायला हवा. अर्ली डिटेक्शन, अचूक टेस्टिंग किट उपलब्ध करुन देणे, अद्यावत सुविधांनी युक्त कोविड रुग्णालये, रेमडेसिव्हिरची उपलब्धता यासाठी आमदारांना वाढीव दोन कोटी रुपये विकासनिधी दिला आहे, तो सर्व जिल्हानियोजनमध्ये जमा करावा, असेही ते म्हणाले.

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वजण चिंतेत आहेत. केवळ आठ दिवस किंवा पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनमुळे तो संपणार नाही. लॉकडाऊनमुळे त्याचे प्रमाण कमी होईल. पण तो समूळ नष्ट होणार नाही. त्यामुळे तात्पुरता लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू करण्यासह प्रदीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे’.

Read More : 

देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर घणाघात, केला ठाकरे सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप

पंढरपूर पोटनिवडणूक : ‘तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी’, सदाभाऊंचा जयंत पाटलांना टोला

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

‘प्राण जाये पर वचन न जाये’, असं उद्धव ठाकरेंचं कार्य’, मुख्यमंत्र्यांची पाठराखण

..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

Related Posts