IMPIMP

Chandrakant Patil | ‘माझ्या मनात शरद पवारांबद्दल अनादर कधीच नव्हता, एकेरी उल्लेख अनावधानाने, चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

by nagesh
Chandrakant Patil | there never disrespect ncp leader sharad pawar rss bjp chandrakant patil

पुणे:  सरकारसत्ता ऑनलाइन  – भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेरी उल्लेख केला होता. यानंतर महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांकडून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण देत तो एकेरी उल्लेख अनावधानाने झाल्याचे म्हटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुण्यात बोलत होते. सांगलीच्या कार्यक्रमात बोलताना अनावधानाने शरद पवार यांच्याबद्दल एकेरीउल्लेख आला. शरद पवार आमचे विरोधक जरी असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात अनादर कधीच नव्हता. बांधाला बांध लागून आमचे काही भांडणही नाही. किंबहुना अनेक वेळा त्यांची स्तुती करत असताना मी सांगत असतो की प्रमोद महाजन (Pramod Mahajan) आम्हाला सांगायचे, मुख्यमंत्री (CM) असताना शरद पवार साहेबांनी 40 गोष्टी लिहून काढल्या त्यातील 38 गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. महाराष्ट्राच्या (Maharashtra) विकासात त्यांचे योगदान आहे. आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS), हिंदू संस्कृतीने (Hindu culture) शिकवले नाही.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?

सांगलीत पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिलं नाही. सगळ आयुष्य गेलं कधी 60 वर तो गेला नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका केली होती.

Web Title: Chandrakant Patil | there never disrespect ncp leader sharad pawar rss bjp chandrakant patil

हे देखील वाचा :

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

BMC Election | भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात; शिवसेना नगरसेवकाचा दावा

Atul Bhatkhalkar | ‘दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही’; भातखळकरांचा शरद पवारांना टोला

Aurangabad Crime | अखेर प्रा.डॉ. राजन शिंदेंच्या खुनाचं गूढ उकललं; कसं मारायचं याचा शोध घेतला Google वर!

Related Posts