IMPIMP

चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाले – ‘सोमवारच्या आत संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर…’

by amol
chandrakant-patil-uddhav-th

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)सोमवारच्या आत जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा घेतला नाही तर तोंड न उडणाऱ्या या सरकारला अधिवेशनातही तोंड उघडू देणार नाही असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकारला 2 दिवसांचा अल्टीमेटम देत हल्ला चढवला आहे.

‘बाळासाहेबांचे सुपुत्र प्रबोधनकारांचे नातू महिला अत्याचारात शांत बसणार नाहीत’

चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्रच नव्हे तर प्रबोधनकारांचे नातू आहेत. महिला अत्याचारात ते शांत बसू शकत नाहीत. ते सत्यवचनी आहेत असं म्हटलं जातं, पंरतु व्यवहारात ते दिसत नाही अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

‘तोंड न उघडणाऱ्या या सरकारला अधिवेशनातही तोंड उघडू देणार नाही’

चंद्रकांत पाटील म्हणतात, गेल्या काही महिन्यात मंत्र्यांशी संबंधित अनेक गुन्हे दाखल होत आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात काहीच भूमिका घेत नाहीत. जर पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांची हाकालपट्टी केली नाही तर तोंड न उघडणाऱ्या या सरकारला, अधिवेशनातही तोंड उघडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका पाटलांनी घेतली.

वानवडी पोलिसांचा तपास कुठपर्यंत ?

पुढं बोलताना पाटील म्हणाले, वानवडी पोलिसांनी काय काय तपास केला हे एकदा जाहीर करावं. वानवडी पोलिसांचा आतापर्यंत तपास नेमका कोणत्या दिशेनं आहे हे सर्वसामान्य जनतेला कळालं पाहिजे. आतापर्यंतच्या तपासावर पोलिसांनी ऑडिओ क्लीप मध्ये राठोड यांचं नाव नाही हे पाहिलं का असे अनेक सवालही त्यांनी केले.

‘चित्रा वाघ यांना आताच कशी त्रास द्यायला सुरुवात झाली ?’

पाटील (Chandrakant Patil) असंही म्हणाले, अनेक मंत्र्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. त्यांच्यावर कारवाई का नाही.
पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवणाऱ्या भाजपच्या चित्रा वाघ यांच्या पतीची चौकशी आताच का सुरू होतेय.
त्यांना आताच कशी त्रास द्यायला सुरुवात झाली असा सवालही त्यांनी केला आहे.
कार्यकर्त्यांवर, पक्षाच्या नेत्यांवर अशा प्रकराच्या कारवाई केल्या तरी आम्ही घाबरणार नाही.
चित्रा वाघ या वाघीण आहेत. भाजप पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे असंही ते आवर्जून म्हणाले.

‘धनंजय मुंडे, मेहबुब शेख अन् आता संजय राठोड; कारवाई नेमकी का होत नाही ?’ : चंद्रकांत पाटील

Related Posts