IMPIMP

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नवं ट्वीट

by omkar
Chhatrapati Sambhaji Raje शिवराज्याभिषेक दिनावर नवं ट्वीट

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din) सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवे ट्विट केले असून यात त्यांनी शिवकालीन होन फोटो शेअर केले आहेत.
तसेच संभाजीराजेंनी आणखी एक ट्वीट केले असून त्यात म्हटले आहे की, स्वराज्याचे सार्वभौमत्व अन् संपन्नतेचे प्रतीक असणारा होन हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे.
राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या अत्यंत दुर्मिळ आणि अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन होनच्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक (Shivrajyabhishek Din) सोहळा साजरा होणार आहे.

Dark Mode : डार्क मोडमध्ये कधीही वापरू करू नका स्मार्टफोन, जाणून घ्या कारण

शिवराय मनामनांत – शिवराज्यभिषेक दिन घराघरांत

दरम्यान 2 दिवसांपूर्वी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून (Chhatrapati Sambhaji Raje) खासदार संभाजीराजेंनी शिवप्रेमींशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी शिवप्रेमींनी 6 जूनला रायगडावर गर्दी करू नये घरीच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा, अशी विनंती केली.
2007 पासून आपण सगळ्यांनीच शिवराज्यभिषेक सोहळ्याला उत्सवाचे स्वरुप दिले आहे. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय उत्सव व्हावा ही माझी मनापासून इच्छा आहे.
पण गेल्यावर्षी कोरोनामुळे उत्सव झाला नाही, पण आपण परंपरा पाळली. गेल्यावर्षी लोकांना मी घरीच राहण्याची विनंती केली होती.
लोकांनीही ऐकलं त्यांचे मी आभार मानतो. यंदाची परिस्थितीही तशीच आहे.
त्यामुळे शिवराय मनामनांत – शिवराज्यभिषेक दिन घराघरांत या भावनेतून घरीच हा सोहळा साजरा करण्याचे आवाहन संभाजीराजेंनी शिवप्रेमींना केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाम

मी सर्वांना घरीच शिवजयंती साजरी करा सांगत असलो तरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाम असल्याचे खासदार संभाजीराजे म्हणाले.
मराठा समाजाला गृहित धरू नका, आमची भूमिका ठाम आणि कायम आहे.
रायगडावरून लाखो बांधवांचा आवाज मांडणारच असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

Also Read:- 

Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ 2 महत्वाचे कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

खुशखबर ! भारतात मुलांना याच महिन्यात मिळू शकते व्हॅक्सीन, जाणून घ्या कुठपर्यंत पोहचली तयारी

नागिण 3 फेम अभिनेता पर्ल पुरी याला बलात्कार प्रकरणात अटक

Pune : पीएमपी संचालक राजीनामा नाट्याचा पुढील अंक ‘पोलिस ठाण्यात’ ! भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हल्ला’

Gold Silver Price Today : 2 दिवसांमध्ये सोनं 1000 रूपयांनी ‘स्वस्त’, चांदी देखील घसरली; जाणून घ्या आजचे दर

कल्याणमध्ये एका घरात आढळली शेकडो कोरी मतदान ओळखपत्र, प्रचंड खळबळ

मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा रेशन कार्ड; जाणून घ्या ऑनलाइन प्रोसेस

Monsoon 2021 : 2 दिवसांत महाराष्ट्रात धडकणार ‘मान्सून’ !

Coronavirus : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून कसे रहायचे सुरक्षित? आतापासून सुरू करा ‘ही’ 8 कामे

Related Posts