IMPIMP

Chhatrapati Shahu Maharaj | अजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…

by omkar
Chhatrapati Shahu Maharaj

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – कोल्हापूरमध्ये (kolhapur) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी न्यू पॅलेस येथे जाऊन श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची (Chhatrapati Shahu Maharaj) यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) पार्श्वभूमीवर चर्चा झाली. यावेळी बैठकीदरम्यान मराठा संघटनेचे नेते, संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे उपस्थितीत होते.

Sucheta Dalal’s Shocking Tweet | सुचेता दलाल यांचे धक्कादायक ट्विट अन् शेअर बाजार ‘कोसळला’, अदानी समूहासाठी ठरला ‘काळा’ दिवस

अजित पवार (Ajit pawar) आणि छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्यात तासभर बैठक सुरु होती. बैठक संपल्यानंतर ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) सकारात्मक असल्याचं छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी माध्यमाशी सवांद साधला.

यावेळी छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) म्हणाले, चर्चेमध्ये मराठा आरक्षण मुद्यासह इतर गोष्टीमध्ये चर्चा झाल्या. मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) सरकार निश्चित सकारात्मक आहे. तसेच मराठा समाजासाठी जे शक्य आहे ते करणार असल्याचे अजित पवार (Ajit pawar) यांनी चर्चेत म्हटलं असल्याचं छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी सांगितले.

इस्त्रायलमध्ये नवीन सत्ता ! 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान

तर अजित पवार (Ajit pawar) याबाबत सविस्तर सांगतील असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जो निकाल दिला आहे त्यावर सर्वानी अभ्यास करणं आवश्यक आहे.
तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केलं पाहिजे, असं मराठा आरक्षणावर बोलले आहेत.
तसेच, मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) अन्य मागण्यांकडे सरकारचं लक्ष असून यापुढेही राहणार आहे.
आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी असं सांगितलं आहे की, मराठा समाजाने आता स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे,
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी तो करणे गरजेचा आहे.
त्याचं मराठीत भाषांतर करुन समजून घेतला पाहिजे. तसेच न्यायालयाचा अवमान होता कामा नये, असे ते म्हणाले.
या दरम्यान, मराठा आरक्षणसाठी (Maratha reservation) ठाकरे सरकार सकारात्मक आहे असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?

पण जर तुम्ही चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे म्हटलं तर कसं आणून देणार अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.
तसेच, केंद्राने जर येथे लक्ष दिलं आणि त्यांना रस असला तर कायद्यात बदल करुनच तुम्हाला पुढचं पाऊल टाकता येईल हे अगोदर सांगायला हवे.
कायद्यात काय बसतं हे सांगायला मी काही कायदेपंडित नाही,
असं देखील यावेळी ते म्हणाले.

Ghatkopar Car Video | मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

Related Posts