IMPIMP

‘मुख्यमंत्र्यांचे भाषण चौकात बोलल्यासारखे, त्यातच सैनिकांचा केला अपमान’; फडणवीसांचा आरोप

by sikandershaikh
devendra-fadanvis-uddhav-th

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)राज्याचे विधीमंडळ अधिवेशन सुरु आहे. अधिवेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी सडकून टीका केली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, चौकात बसल्यासारखे मुख्यमंत्र्यांचे भाषण होते. अजूनही त्यांच्या लक्षत येत नाही की सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलायचे असते. वीज कनेक्शन कापण्यापासून कृषी विम्यापर्यंतच्या एकाही मुद्द्यावर ते बोलले नाहीत, त्यांनी राज्यातील जनतेचा पूर्णत: भ्रमनिरास केला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना कहरच झाला. अमेरिकेपासून काश्मीर-कन्याकुमारीपर्यंत मुख्यमंत्री फिरून आले पण महाराष्ट्रावर समाधानकारकपणे काहीच बोलले नाहीत. त्यातच त्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

फडणवीस (devendra fadanvis) म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे ‘चीनसमोर आला की पळे’ हे विधान सैनिकांचा अपमान करणारे आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांनी उणे ३० च्या तापमानातसुद्धा एक इंचही जमीन चीनला मिळू दिली नाही, मग मुख्यमंत्री असे विधान कसे काय करू शकतात ? मुख्यमंत्र्यांचे एक नवे रूप आज पाहायला मिळाले.
खोटे बोला पण ररेटून बोला मुख्यमंत्री उसने अवसान आणून गृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भात बोलले.
सत्य काय ते त्यांना माहिती आहे. असेही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले शिवसेना स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हती पण सोबतच त्यांनी रा. स्व. संघाचा उल्लेख केला.
पण संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार हे स्वत:च स्वातंत्र्यसैनिक होते.
हे ध्यानात घ्यावे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी
लावून मुख्यमंत्री बसलेले आहेत, हे कुठले हिंदुत्व, असा सवाल फडणवीस यांनी केला.
उत्तर प्रदेशात हिंदुंविरुद्ध गरळ ओकण्याची हिंमत शर्जिल उस्मानीची झाली नाही, त्यासाठी तो महाराष्ट्रात येऊन बोलला, अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून नितेश राणेंची टीका, म्हणाले – ‘शिवसेनेची काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याची वेळ आलीय’

Related Posts