IMPIMP

PM मोदींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना !

by omkar
Uddhav Thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  राज्यासमोरील असलेल्या विविध प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) हे मंगळवारी सकाळी दिल्लीला रवाना झाले.
त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे असणार आहे.
मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा राज्यासमोरील मोठी समस्या बनला आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, यावर या भेटीत प्रामुख्याने भर असणार आहे.

8 जून राशीफळ : ‘या’ 4 राशींनी राहावे सावध, धनहानीचे संकेत, इतरांसाठी असा आहे मंगळवार

मोदी यांच्याबरोबर बोलताना महाराष्ट्राची बाजू मांडताना काय बोलायला हवे,
याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही सूचना केल्याचे समजते.
राज्यांच्या आरक्षण देण्याचा अधिकार अबाधित आहे, हे लक्षात आणून द्यावे.
तसेच फेरविचार याचिका करतो आहोत, हे सांगून सामाजिक अभिसरणासाठी मराठा समाजाचे आरक्षण अबाधित ठेवण्याचा मुद्दा केंद्राने समजून घ्यावा, अशा काही सूचना केल्या आहेत.

मराठा आरक्षण प्रकरणी केंद्राने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे़ या भेटीत ते ही अपेक्षा प्रत्यक्ष बोलून दाखवतील. मराठा आरक्षणाबरोबरच राज्याला होणारा कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा, जीएसटी थकबाकीची रक्कम राज्याला त्वरीत देणे या ठळक मुद्द्यांचा चर्चेत समावेश असणार आहे. या चर्चेच्या दरम्यान, राज्य शासनाच्या वतीने एक पत्रही देण्यात येणार आहे.

गेल्या दीड वर्षात केंद्र आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संबंध टोकाचे ताणले गेले आहेत. या भेटीनंतर या संबंधातील तणाव दूर होण्यास मदत होणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Also Read:- 

PM मोदींची मोठी घोषणा ! केंद्र सरकार 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार

हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप, म्हणाले- मोदी सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले

Sachin Vaze | नालेसफाई करणार्‍या कंत्राटदाराकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी वाझेवर होती, भाजपकडून आरोप

Pune Crime News | वाहन आणि मोबाईल चोरी करणार्‍या सराईतांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकानं पकडलं, 7 गुन्हयांची उकल

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या

PM मोदींना सहकाऱ्यांचा विसर? गडकरींपाठोपाठ योगींनाही दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Web Title- Chief Minister Uddhav Thackeray leaves for Delhi to meet PM Modi!

Related Posts