IMPIMP

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले…

by pranjalishirish
MNS On Shivsena | mns gajanan kale slams shivsena uddhav thackeray ncp over dasara melava

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मास्क न घालण्यावरून आणि इतरांनाही घालू न देण्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. असं करण्यात कुठलं शौर्य आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

नियमांचं काटेकोरपणे पालन होत नसल्यानं राज्यात महाराष्ट्रात कोरोनासंसर्ग वाढत असल्याचं स्पष्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. कोरोनाची खिल्ली उडवणारे आणि लॉकडाऊन विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा करणारे आणि मास्क न वापरणारे अशांना सीएम ठाकरेंनी चांगलंच फटकारलं आहे. त्यांनी राज ठाकरे  Raj Thackeray यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका

‘मास्क न वारण्यात शौर्य कसलं ? मास्क वापरत नाहीस म्हणजे तू कोणी शूर आहेस का ?’

उद्धव ठाकरे म्हणाले, लोकांना असं वाटतं की, मास्क वगैरे काय लावायचा ? मी मास्क वगैरे वापरत नाही असं काही लोक इतरांना सांगतात. पण मास्क न वारण्यात शौर्य कसलं ? मास्क वापरत नाहीस म्हणजे तू कोणी शूर आहेस का ? मास्क वापरण्यात लाज वाटण्यासारखं काय आहे ? असे अनेक सवाल करत सीएम ठाकरेंनी खोचक टीका केली आहे.

मास्कवर मास्क लावलाय’ असं म्हणत राज ठाकरेंनी माजी महापौरांना काढायला लावला मास्क

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे Raj Thackeray  नाशिक दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वगतासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हॉटेलच्या परिसरात गर्दी केली होती. माजी महापौर अशोक मुर्तडक हे देखील पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या स्वागतला आले. यावेळी मुर्तडक यांनी एकावर एक असो दोन मास्क लावले होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या तोंडावर दोन मास्क पाहिले आणि मास्कवर मास्क असं विचारताच मुर्तडक यांनी मास्क बाजूला केले.

अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…

‘मी मास्क लावतंच नाही’

खास बात अशी की यावेळी राज ठाकरे यांनीही मास्क लावला नव्हता. इतकंच नाही तर माजी महापौरांना मास्क काढण्यासाठी राज ठाकरे यांनी इशारा करताच उपस्थित असलेल्या इतर पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देखील लगेच तोंडावर लावलेले मास्क बाजूला केले. राज ठाकरे कधीच मास्क लावताना दिसले नाहीत. याबाबत विचरणा केल्यानंतर मी मास्क लावतंच नाही असं त्यांनी खूपदा सांगितलं आहे.

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

‘पर्यायी मार्ग न सापडल्यास लॉकडाऊन करावा लागेल’, मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढता कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि 2 एप्रिल) राज्यातील जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊन हा उपाय नाही, पण त्याला पर्याय हवा. विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करणार असून पर्यायी मार्ग न सापडल्यास लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला.

Also Read : 

दुर्दैवी ! ‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नुकतेच सन्मानित झालेले जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कठोर निर्बंध लावणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

पत्नी रूग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, टिका करणं सोपं पण…’

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘हा तर धक्कादायक विनोद !’

Photos : ‘ही’ Hot मॉडेल लढवणार जौनपूर पंचायत निवडणूक !

Related Posts