IMPIMP

CM Uddhav Thackeray । … पण त्याविषयी मी तुर्तास बोलणार नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना टोला

by bali123
CM Uddhav Thackeray । bjp chakka jam protest devendra fadnavis pankaja munde cm uddhav thackeray slam fadnavis

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (Political reservation of OBC) मुद्द्यावरून आज भाजपने (BJP) राज्यभर चक्का जाम आंदोलन सुरु केलं आहे. यावरून अनेक सत्ताधारी आणि विरोधक आरोपप्रत्यारोप वरून एकमेकास भिडले आहे. मात्र, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला आहे. ‘अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यावेळी ते कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

सारथीच्या कोल्हापूरातील उपकेंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज भाजपच्या राज्यभर आंदोलनावर प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. परंतु, त्यामुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, ‘नाती ओढूनताणून पुढे नेता येत नाहीत, असे त्यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्यावेळी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांचं कौतुक केलं. तसेच मराठा समाजाचे आभार मानले. ‘संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात. अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही,” असा त्यांनी अप्रत्यक्ष टोला देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) लगावला.
पुढे ते म्हणाले, ‘आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज वाटलं असतं, तर काहीही करु शकला असता.
आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायचे आहेत.
आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही.
आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणार आहे.
मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल.
सरकार कोणत्याही प्रकारे मागे राहणार नाही, असे वचन मी तुम्हाला देतो, असे मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे.

Web Title :- CM Uddhav Thackeray । bjp chakka jam protest devendra fadnavis pankaja munde cm uddhav thackeray slam fadnavis

Related Posts