IMPIMP

CM Uddhav Thackeray । शिवसेनेचं ‘मिशन महाराष्ट्र’; CM उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना कानमंत्र

by bali123
CM Uddhav Thackeray | shivsena meeting at shivsena bhavan cm uddhav thackeray gave important orders to shiv sainiks

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) CM Uddhav Thackeray | राज्यभरातील शिवसेनेच्या (Shivsena) सर्व जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक आज (गुरुवारी) शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) संपन्न झाली. या बैठकीदरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना कानमंत्र दिले आहेत. ‘तुम्ही आघाडी किंवा युती होणार का? याची चिंता करू नका. तुम्ही फक्तं जनतेची कामे करीत रहा. राज्यभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा’ असा आदेश उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

शिवसेना नेते अनिल देसाई (Shiv Sena leader Anil Desai) यांच्या उपस्थितीत ही संघटनात्मक बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुखांना (Shiv Sena district chief) मार्गदर्शन केलं आहे. बैठकीदरम्यान बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कोरोनाच्या संसर्ग काळात तुम्ही चांगलं काम केलंत. अशीच चांगली कामं पूढेही करत रहा. शाखा प्रमुखांनी प्रत्येक गाव कोरोनामुक्तं करा. महापालिका, नगरपालीका, ग्रामपंचायतीत (Municipal Corporation, Nagarpalika, Gram Panchayat) जाऊन जनतेसाठी कामं करा. आता आपण सत्तेत आहोत. सत्तेत असताना तुम्ही शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी, जनतेमध्ये जाऊन कामं केली पाहीजेत. राज्यभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नं करा, ‘मी तुमच्या पाठीशी आहे. असं उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना सांगितलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या दरम्यान, शिवसेना राज्यभर ‘शिवसंपर्क मोहीम’ (Shiv Sampark Mohim) सुरू करणार आहे. या माध्यमातून राज्यभर ही मोहीम आगामी 12 ते 24 जुलैपर्यंत राज्यात राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, ‘माझं गाव, कोरोना मुक्तं गाव’ यासाठी प्रत्येक घरा घरामधून शाखा प्रमुखांनी जनतेची माहिती घ्यावी. लसीकरण (Vaccination) केलंय की नाही, त्यांच्या अन्य काही अडचणी आहेत का? विकासात्मक योजना त्यांच्यापर्यंत पोहचत आहेत की नाही. याची देखील माहिती घ्या असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

Web Titel : CM Uddhav Thackeray | shivsena meeting at shivsena bhavan cm uddhav thackeray gave important orders to shiv sainiks

Related Posts