IMPIMP

CM Uddhav Thackeray | मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार

by nagesh
CM Uddhav Thackeray | मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  CM Uddhav Thackeray | राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच मराठवाडा आणि विदर्भाला (Marathwada and Vidarbha) पावसानं (rain) झोडपून काढलं आहे. मराठवाड्यात काही दिवस जोरदार पावसाने शेतीचं अधिक नुकसान झालं आहे. या पार्श्वभुमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महत्वाची घोषणा केली आहे. मराठवाड्यात (Marathwada) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या (Farmers) पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे (Farmers) अनेक पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे तेथील शेतकरी चिंतेत पडला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी यांनी दिले आहेत. मराठवाड्यात मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला आहे. यानंतर त्यांनी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल सायंकाळी आणि आज (बुधवारी) सकाळी देखील मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte) तसेच मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता (Principal Secretary Asim Kumar Gupta) यांना देखील त्यांनी सूचना दिल्या आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे.

Web Title : CM Uddhav Thackeray | uddhav thackeray said maharashtra government will help farmer of marathwada

हे देखील वाचा :

Bank Rules | 1 ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ 7 महत्वाचे नियम, सॅलरीपासून पेमेंट सिस्टममध्ये होईल बदल; जाणून घ्या होईल फायदा

Pune Crime | भिकारी आणि भंगारवाल्यामुळे खुनाचा उलगडा; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

Tax on Gold Investment | सोन्यात गुंतवणूक केल्यास कोण-कोणते टॅक्स द्यावे लागतात?, गुंतवणुकीचे प्रकार किती?; जाणून घ्या

Related Posts