IMPIMP

CM Uddhav Thackeray | ‘गरम पाण्याच्या नावाखाली कोमट पाणी’; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भाषणावर ‘मनसे’चा निशाणा

by nagesh
Sandeep Deshpande | mns leader sandeep deshpande corruption allegations on uddhav thackeray reveals on 23 january

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन CM Uddhav Thackeray | दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे. यानंतर आता विरोधकांकडून देखील पलटवार केला जात आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे पर्वणी असायची आता मात्र सगळंच अळणी. गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी, असल्याची टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande mns) यांनी केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

परंपरेप्रमाणे शिवसेनेचा मेळावा दसऱ्याला पार पडला, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे. देशामध्ये सध्या छापा टाकायचा आणि पुढच्याचा काटा काढायचा हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं हे नामर्दाचं लक्षण आहे, मर्दाचं नाही आणि हिंदुत्वाचं तर मुळीच नाही, असा घणाघात यावेळी ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी केला आहे.

तुमच्या आशिर्वादाने पुढील महिन्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) दोन वर्षे पूर्ण करेल. सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंमत असेल तर पाडून दाखवा, तसं करून पडत नाही म्हणून छापा-काटा खेळ सुरु झाला आहे. छापा टाकायचा आणि काटा काढायचा, ही थेरं जास्त काळ चालू शकणार नाहीत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला (BJP) लगावला.

दरम्यान, विरोधकांकडून टीका केली जात असली तरी महाविकास आघाडीतील नेते मात्र ठाकरेंच्या भाषणाचे समर्थन करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख यांचे दसरा मेळाव्यातील आजचे भाषण म्हणजे “सौ सोनार की एक लोहार की” असे होते. महाराष्ट्राच्या मनातील अनेक वर्षांची खदखद देशासमोर मांडल्याबद्दल उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आभार. प्रबोधनकार ईज बॅक, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मेटकरी (ncp mla amol mitkari) यांनी केले आहे.

Web Title :- CM Uddhav Thackeray | ‘Warm water under the name of hot water’; MNS targets Chief Minister Uddhav Thackeray’s yesterdays speech

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात भाड्याच्या फ्लॅटमध्ये ऑनलाईन जुगाराचा अड्डा ! छापा टाकणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की; 7 जणांना अटक

Petrol Diesel Price Pune | पुण्यात डिझेलची ‘शंभरी’ पार ! 15 दिवसात साडेचार रुपयांची दरवाढ

Shivsena Dasara Melava | छापा-काटा ! हिंमत असेल तर पाडून दाखवा; CM उद्धव ठाकरेंचे भाजपला ‘आव्हान’

Shiv Sena Dussehra Melawa | ‘…कदाचित मी राजकीय जिवनातून बाजूला झालो असतो’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (व्हिडीओ)

Related Posts