IMPIMP

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, लिहीलं – ‘शेतकरी, सलून चालक, डबेवाल्यांना पॅकेज देण्याची मागणी’

by Team Deccan Express
congress demands to add more elements in the package declared for corona lockdown

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील अस्थापना वगळून इतर अस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. सरकारने निर्बंध लागू करताना राज्यातील छोटे व्यावसायिक, गरीबांसाठी पॅकेजची घोषणा केली. पण यामध्ये काही घटकांचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने congress काही घटकांचा या पॅकेजमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, टॅक्सि चालक, मासळी विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि इतर लहान व्यावसायिकांसाठी मदतीची गरज असून त्यांच्यासाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे.

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’

नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात कोरोना महामारीची भयंकर स्थिती पाहता सरकारने संचारबंदी (लॉकडाऊन) घोषित केली आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप रोखण्यसाठी लॉकडाऊनच्या माध्यमातून ही साखळी तोडणे आवश्यक होते, म्हणून आपण घोषित केलेल्या संचारबंदीचे काँग्रेस congress पक्षाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार संचारबंदी कालावधीसाठी छोट्या व्यावसायिकांकरिता पॅकेज जाहीर केले आहे, पण या पॅकेजमध्ये आणखी काही घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसची congress आग्रही भूमिका असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. यामध्ये शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, टॅक्सि चालक, मासळी विक्रेते, मुंबईचे डबेवाले यांचा पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला, फळबागायती व फुलांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. कारण या कालावधीत मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या मालाचा उठाव मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. तसेच सलूनचे दुकान बंद असल्याने या व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. धार्मिक स्थळांवर बंदी असल्याने फुल विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ येईल. शिवाय मुंबईतील महत्त्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांचाही या पॅकेजमध्ये समावेश करुन या घटकांना लाभ द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी पत्रातून केली आहे. तसेच यासाठी लागणाऱ्या निधीची अतिरिक्त तरतूद करावी आणि या घटकांना न्याय द्वावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

Also Read :

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल

नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…

‘डबल रोल’ ! एकीकडे मुलीची भूमिका निभावत असताना दुसरीकडे नेत्याची भूमिका पार पाडत आहेत सुप्रिया सुळे

चंद्रकांत पाटलांचे सरकार पाडण्याबाबत पुन्हा मोठं वक्तव्य; म्हणाले…

भाजपचं पितळ उघडं पाडण्यासाठी काँग्रेसकडून यू-ट्यूब चॅनल लाँच

Related Posts