IMPIMP

बाळासाहेब थोरातांची जोरदार टीका, म्हणाले- ‘मोदी सरकारच्या बहिरेपणावर इलाज करणं गरजेचं’

by sikandershaikh
congress-leader-balasaheb-thorat

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि काँग्रेस मंत्री व आमदार हे आजपासून (सोमवार दि 1 मार्च 2021) सुरू झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सायकलवरून पोहोचले. पेट्रोल-डिझेल आणि गॅस यांच्या वाढत्या किंमतीला विरोध करण्यासाठी त्यांनी हा सायकल प्रवास केला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत इंधन दरवाढ मागे घ्यावी या मागणीचा पुनुरूच्चार केला.

काँग्रेसनं म्हणाली, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारनं जनतेचं जगणं मुश्किल केलं आहे असा आरोपही काँग्रेसनं केला. काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करत इंधन दरवाढीचा विरोध केला.

‘जनतेला अन्यायकारक पद्धतीनं लुटलं जातंय’

बाळासाहेब थोरात म्हणाले, 2014 पूर्वी भाजप नेते इंधन दरवाढीवरून आरडा ओरडा करत होते.
परंतु तेच नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढ करून जनतेची लुट करत आहेत.
रोज इंधनांचे दर वाढत आहेत. मोदी सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही.
त्यांच्या बहिरेपणावर इलाज करणं गरजेचं आहे असा हल्लाबोल थोरातांनी यावेळी केला.

…अन्यथा उद्रेक होईल’

पुढं बोलताना थोरात (balasaheb thorat) म्हणाले, आम्ही सायकल रॅली काढून मोदी सरकारला इंधन दरवाढ मागे घ्या हे ठणकावून सांगितलं आहे.
जनतेच्या वेदना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सरकारनं याची दखल घ्यावी, अन्यथा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी यवेळी बोलताना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याचा मुलगा कोरोना पाँझिटिव्ह

Related Posts