IMPIMP

Congress | काँग्रेसच्या कार्यकारिणीत पुण्यातील 7 पदाधिकार्‍यांना संधी, रमेश बागवे शहराध्यक्षपदी कायम

by nagesh
MVA Vajramuth Sabha | mahavikas aghadi vajramuth sabha nagpur problems in congress as nitin raut unhappy

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Congress | महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस शहराध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरु झाली होती. तिला आता विराम मिळाला असून रमेश बागवे यांनाच शहराध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. काँग्रेसने (congress) गुरुवारी रात्री उशिरा जंबो प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात पुणे शहरातील 7 जणांना संधी देण्यात आली आहे.

राज्यभरातील 18 उपाध्यक्ष, 65 सरचिटणीस, 104 चिटणीसासह काही शहराध्यक्षपदे जाहीर केली आहेत. त्या पुण्यातून कार्यकारी समितीत ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांची तर सरचिटणीसपदी अ‍ॅड. अभय छाजेड, रोहित टिळक आणि वीरेंद्र किराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिटणीस म्हणून गोपाळ तिवारी आणि दीप्ती चौधरी यांची निवड झाली आहे. माजी आमदार अनंत गाडगीळ यांची प्रदेश प्रवक्ते म्हणून निवड कायम ठेवण्यात आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर तब्बल 5 महिन्यांनी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप या सर्वात तरुण असून दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेस राज्य कार्यकारिणीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्षपद माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांच्यावर सोपविण्यात आले आहे. शहर काँग्रेसाध्यक्षपद बदलण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
यांच्याकडे स्थानिक कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, रमेश बागवे यांच्या जागेवर कोण याचा प्रश्न न
सुटल्याने बागवे यांची निवड कायम राहिली. आता काँग्रेसला बागवे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका
निवडणुक लढवावी लागणार आहे. बागवे यांनाही स्थानिक नेत्यांची मिळते जुळते घेऊन नव्याने तयारी करावी लागणार आहे.

Web Title : Congress | Opportunity for 7 office bearers from Pune in the Congress executive, Ramesh Bagwe remains as the city president

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोनं खरेदीची हीच सुवर्णसंधी ! आज पुन्हा सोन्याचा दर घसरला; जाणून घ्या

Anil Deshmukh Case | अखेर राज्य सरकार सीबीआयला देणार संबंधित आवश्यक कागदपत्रे

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 282 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts