IMPIMP

काँग्रेसकडून हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचं काम ! मोदींचं धोरण ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ : अमित शाह

by bali123
congress wants to make people fight in the name hindu muslim amit shah

कामरुप/आसाम : वृत्तसंस्था – आसाममध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे 1 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. भाजपचे अनेक दिग्गज नेते आसाममध्ये प्रचार करत आहेत. आज (बुधवार) अमित शहा amit shah यांनी आसामच्या कामरुपमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. दरम्यान कामरुपमध्ये राहुल गांधी यांची देखील आज सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह amit shah यांनी कामरुप येथे प्रचारसभेत काँग्रेसवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप करत हल्लाबोल केला. काँग्रेस लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या घोषणेची आठवण करुन दिली.

Girish Bapat : ‘महाविकास आघाडी सरकारने आत्तापर्यंत पुण्याकडे दुर्लक्ष केले’

काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले, काँग्रेसला लोकांमध्ये बोडो आणि इतर, आसामी-बंगाली, हिंदू-मुस्लीम, वरील आसाम-खालील आसाम, आदिवासी-बिगरआदीवासी अशी फूट पाडू पहात आहे. नरेंद्र मोदींची घोषणा मात्र ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ अशी असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

भाषणात आसामच्या नागरिकांना आश्वासन देताना अमित शाह amit shah म्हणाले, भाजप सत्तेत आल्यानंतर राज्याचा सर्वसमावेशक विकास करण्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच अल्पसंख्यांसहीत सर्वांना समान सोयी उपलब्ध करुन दिल्या जातील. आम्ही जेव्हा घरोघरी पाणी पुरवू तेव्हा प्रत्येक घरात पाणी पुरवलं जाईल. यामध्ये मुस्लिमांच्या घरांचाही समावेश असेल. आम्ही जेव्हा सर्वांना घरं देऊ तेव्हा त्यामध्ये अल्पसंख्यांक समाजातील लोकांचाही समावेश असेल. अल्पसंख्यांक, आदिवासी, बोडो या सर्वांना 10 हजार रुपयांची मदत केली जाईल, शेतकऱ्यांना आसाम सरकार मदत करेल, अशी आश्वासनं अमित शहांनी दिली आहेत.

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न; फक्त ‘या’ तीनच नेत्यांचीच उपस्थिती

मी नरेंद्र मोदी नाही – राहुल गांधी
दरम्यान, कामरुपमध्ये झालेल्या प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, मी इथे तुमच्याशी खोटं बोलण्यासाठी आलेलो नाही. कारण माझं नाव नरेंद्र मोदी नाही. आसाम, शेतकरी किंवा इतर कोणत्याही गोष्टीविषयी जर खोटं ऐकायचे असेल तर, तुम्ही टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदींच तोंड बघा, ते पूर्ण 24 तास खोटं बोलतात, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. तसेच भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, भाजपकडून रोजगार देण्याचा प्रयत्न केला जात नाही. युवकांना मदत केली जात नाही. उलट आसामवर आक्रमण केले जात आहे. सीएए हा कायदा आसामवरचं आक्रमण असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

Also Read:

सचिन वाझे ‘वर्षा’वर जाऊन कसे राहायचे? असा सवाल करत नितेश राणेंचा गंभीर आरोप, म्हणाले…

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

Related Posts

Leave a Comment