IMPIMP

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

by nagesh
mp amol kolhe tested covid 19 positive

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी ट्विटरवर देशातील सध्याच्या कोरोना परिस्थितीवर आपली भूमिका मांडली. यावेळी केंद्र सरकारने नव्या संसद भवनाच्या बांधकामावर पैसे खर्च करण्याआधी आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चाला प्राधान्य द्यावे, असे सुचवले होते. अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावरुन भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उलट सल्ला दिला आहे. देश भयानक परिस्थितीशी झुंजतोय, देशाला नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट, कोविड केअर सेंटरची जास्त आहे, असे तत्वज्ञान पाजळणाऱ्या अमोल कोल्हे यांनी हे ज्ञानामृत या भयानक परिस्थितीत सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले ?
देशात सध्या आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करण्याची जास्त आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारने खासदार कोट्यातील निधींची पूर्तता करावी. दररोज 1500 पेक्षा जास्त रुग्ण दगावत आहेत. आपला देश सध्या भयानक परिस्थितीशी झुंजत आहे. देशातील आरोग्याची पायाभूत सुविधा वाढवण्याची आवश्यकता आहे. भारताला सध्या नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लाँट, कोव्हिड सेंटर, आरोग्यासाठी लागणारे महत्त्वपूर्ण साधनसामग्री यांची जास्त आवश्यकता आहे, असे अमोल कोल्हे Amol Kolhe यांनी म्हटले होते.

Also Read :

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

Related Posts