IMPIMP

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

by pranjalishirish
Imtiyaz Jaleel on Sharad Pawar | NCP Chief sharad pawar promoting raj thackeray for weakening shiv sena claims mim mp imtiaz jaleel

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकारकडून लॉकडाऊनचा lockdown  इशारा देण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लॉकडाऊनला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्याला आणि जनतेला लॉकडाऊन परवडणारा नसून मुख्यमंत्र्यांनी इतर पर्यांयांचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.

सरकार स्थापनेवर भाजपच्या बड्या नेत्याचे विधान; ‘आता वरून कसा आदेश येतो ते पाहायचे’

प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाव मलिक म्हणाले, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एका दिवसात 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहे. मात्र, लॉकडाऊन  lockdown हा शेवटचा पर्याय नाही. लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचा आग्रह धरला आहे. राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी सचिवांना लॉकडाऊनची तयारी करण्यास सांगितले आहे. मात्र याचा अर्थ लॉकडाऊनच केले पाहिजे असे नाही. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकते, असे मलिक यांनी सांगितले.

आनंद महिंद्रांचा Lockdown बाबत ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले – ‘त्या’वर पुन्हा लक्ष केंद्रीत करूयात’

लॉकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याचे आव्हान महाविकास आघाडी सरकारसमोर आहे. परंतु संपूर्ण लॉकडाऊन lockdown करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी परिस्थितीनुसार कठोर निर्बंधावर भर देण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

CM ठाकरेंचे मुख्य सचिवांना आदेश, म्हणाले – ‘Lockdown ची तयारी करा’

राज्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरु राहणार आहे. मात्र रेस्टॉरंट्स, मॉल्स, सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालये आणि पब्ज यांच्यावर त्या ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्बंध लादले जातील. 50 टक्क्यांपेक्षा कमी कर्मचारी उपस्थितीचा नियम पाळला जात असल्याची खात्री करण्याचे आदेश कार्यालयांना दिले जातील, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

भाजप नगरसेविकेच्या मुलाची आत्महत्या, तपास सुरु

राज्याचे पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या अनिर्बंध वावरावर अंकुश आणण्यासाठी काही निर्बंध घालण्याचे नियोजन सुरु आहे. अपेक्षेप्रमाणे रुग्णसंख्येत घट झाली नाही तर आम्ही पुढील पातळीवर कठोर निर्बंध लागू करण्यासाठी पाऊल उचलू, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Also Read:

लस घेऊनही शेकापचे आमदार जयंत पाटील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

राष्ट्रवादीसोबत जाणार का ?, त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही’ (व्हिडीओ)

Related Posts