IMPIMP

नागपुरात कोरोनाचे थैमान सुरु असताना फडणवीस, गडकरी आहेत तरी कुठे?; काँग्रेसचा सवाल

by Team Deccan Express
Nitin Gadkari | nagpur bjp leader nitin gadkari slams vijay wadettiwar says devendra fadnavis is like my younger brother

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – congress | राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही एक चिंतेची बाब ठरत आहे. तसेच महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गेले कुठे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस congress कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.

नागपूर महापालिकेवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात नागपूर महानगरपालिका अयशस्वी ठरल्याने उच्च न्यायालयानेही त्यांच्यावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. शहरात 10 झोन असताना या झोनमध्ये ट्रेसिंगचे काम व्यवस्थित होत नाही. तापाच्या रुग्णांना पॅरासिटेमॉलच्या गोळ्या देऊन पिटाळले जात आहे. कोरोना आटोक्यात आणण्यावर भर देण्यापेक्षा खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. नागपूरकर एवढ्या मोठ्या गंभीर संकटाला तोंड देत आहेत. मात्र, फडणवीस आणि गडकरी आहेत तरी कुठे? असे प्रश्न विचारले जात आहेत.

तसेच ते पुढे म्हणाले, भाजी मंडईचे विक्रीकेंद्रीकरण केले पण तेथील गर्दी नियंत्रित करता येत नाही. होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांवर महापालिकेचे नियंत्रण नाही. त्यातील अनेकजण शहरात बिनधास्तपणे फिरून कोरोना स्प्रेडरचे काम करत आहेत. राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले तरी त्याची व्यवस्थित अंमलबजावणीही करता येत नाही, असेही ते म्हणाले.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts