IMPIMP

Deglur Assembly bypolls result | भाजपाला धक्का ! देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

by nagesh
Deglur Assembly bypolls result | deglur biloli assembly bypolls election result congress jitesh antapurkar wins bjp subhash sabane lost

नांदेड : सरकारसत्ता ऑनलाइन Deglur Assembly bypolls result | संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल (Deglur assembly bopolls result) समोर आला आहे. या पोटनिवडणुकीत भाजपला (BJP) धक्का देत महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. काँग्रेसचे (Congress) उमेदवार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपकडून माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabane) यांचा पराभव झाला आहे.

काँग्रेसचे नेते दिवंगत रावसाहेब अंतापुरकर (Raosaheb Antapurkar) यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांना उमेदवारी देण्यात आली होती.
मुख्य लढत जितेश अंतापूरकर आणि भाजपचे सुभाष साबणे यांच्यात झाली.
ही निवडणूक काँग्रेसनेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती.
तर भाजपाने देखील ही जागा जिंकण्यासाठी कंबर कसली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच लढत झाली. वंचित आघाडीने देखील आपला उमेदवार दिला होता.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती.
आता या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. काँग्रेसने ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत मैदानात उतरले होते. अखेर काॅग्रेसला याठिकाणी यश आलं आहे.

Web Title : Deglur Assembly bypolls result | deglur biloli assembly bypolls election result congress jitesh antapurkar wins bjp subhash sabane lost

हे देखील वाचा :

Paytm IPO | पुढील आठवड्यात येत आहे देशातील सर्वात मोठा IPO, तुम्हाला मिळणार कमावण्याची संधी; जाणून घ्या काय आहे प्राईस बँड?

Anil Deshmukh | अनिल देशमुखांची दिवाळी ED च्या कोठडीत, न्यायालयाने सुनावली ‘एवढ्या’ दिवसांची कोठडी

PMGKY | 2 दिवसांत देशभरात बंद होणार मोफत रेशनचे वितरण ! 80 कोटी गरीब जनतेवर होणार PMGKY बंद केल्याचा परिणाम

Related Posts