IMPIMP

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

by pranjalishirish
deposit money poor peoples bank account first then lockdown prithviraj chavan government maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत काही पूर्वतयारी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याने राज्यात अनेक बाजूने लॉकडाऊन करण्यास विरोध होत आहे. तर यावरून आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan  यांनीही त्याला विरोध केला आहे. लॉकडाऊन करणार असाल, तर अगोदर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करा, अशा शब्दात एक चेतावणीचा सल्ला चव्हाण यांनी राज्य शासनाला दिला आहे. असे म्हणत चव्हाण यांनी आपल्या ट्विटरद्वारे पोस्ट शेअर केले आहे.

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan म्हणाले, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढत आहे, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे, प्रशासन आणि राज्य शासन यांच्यापुढे पेचप्रसंग उभा आहे. सध्या उद्योजकांपासून ते सर्वसामान्य लोक लॉकडाऊन विरोध करत आपलं मत मांडत आहे. त्यामुळे, राज्य शासनाने काही बाबी लक्षात घ्याव्यात, असे ते म्हणाले, तसेच लॉकडाऊन करण्यापूर्वी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्या, लॉकडाऊनचा कालावधी कमीत कमी असावा, तर बुडणाऱ्या रोजगाराची शासनाने भरपाई द्यावी, ती रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. त्यासाठी, आमदार व खासदार यांच्या स्थानिक निधीचा वापर करावा. खासगी वाहनातून प्रवासास मुभा द्यावी, शेतमाल व औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेऊन, पुरवठा साखळीवर परिणाम होऊ न देणे, लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येनं वाढवणे. अशा सूचना चव्हाण Prithviraj Chavan  यांनी राज्य सरकारला केल्या आहेत.

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा लॉकडाऊनला असलेला विरोध बघता राज्यात लॉकडाऊनचीच चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनीही महत्त्वाची माहिती दिली. लॉकडाऊन कोणालाही आवडत नाही. परंतु, तहान लागल्यावर विहीर खणायची नाही. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल. लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला तरी त्याचं स्वरुप गेल्या लॉकडाऊनसारखं नसेल. कठोर लॉकडाऊन केला जाणार नाही,’ असं टोपेंनी सांगितलं.

Also Read:

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार थांबवा : यशोमती ठाकूर

पवार-शहा भेटीबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, राज्य सरकार स्थिर’

इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा ! न्यायालयानं रद्द केला ‘तो’ खटला

1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

Related Posts