IMPIMP

Sanjay Raut : अनिल देशमुखांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले

by nagesh
deshmukh got post home minister accident sanjay raut fired mva govt and anil deshmukh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – देशमुख यांना गृहमंत्रीपद अघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले, असा दावा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. संजय वाझे प्रकरणावरुन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्र्यांवर आरोप केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणावर तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये वेगळीच कुजबुज सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच संजय राऊत Sanjay Raut यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर रोखठोकच्या माध्यमातून बाण चालवले आहेत.

‘भारतीयांपेक्षा अधिक लसी परदेशात पाठवल्याची कबुली सरकारनं UN समोर दिली, पण जर…’

संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून काम करता येत नाही
जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद घेण्यास नकार दिल्याने अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद मिळाले. देशमुख यांना मिळालेले गृहमंत्री पद हे अपाघाने मिळाले आहे. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आणि दहशत आहे. आर.आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. त्यातच पोलीस खाते आधिच बदनाम आहे. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो.

देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘सचिन वाझेंच्या 3 मालकांना फक्त ‘ही’ एकच चिंता’

गृहमंत्रीपद ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते
अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विनाकारण पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशीचे जाहीर आदेश देणे बरोबर नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असले पाहिजे. पोलीस खात्याचे नेतृत्तव फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होत असतो हे विसरुन कसे चालेल ? असा टोला संजय राऊत Sanjay Raut यांनी गृहमंत्र्यांना लगावला आहे.

‘IPS शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरलीय, खंडणीखोरीचे बिंग फुटले’; भाजप नेत्याची टीका

परमबीर सिंह महत्त्वकांक्षी अधिकारी
मनसुख हिरेन आणि अँटिलिया स्फोटकं प्रकरणात राज्य सरकारने मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी बदली केली. परमबीर सिंह हे महत्त्वकांक्षी अधिकारी आहेत. होमगार्ड महासंचालक पदावर झालेली बदली त्यांना सहन झाली नाही. त्यांच्या अस्वस्थेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तेल ओतले. पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावे लागले असे एक विधान करताच परमबीर सिंह यांनी देशमुखांनी 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे पत्र लिहून स्फोट केला. हे टार्गेट कोणाला दिले तर मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांना.

15 एप्रिल पर्यंत Lockdown वाढवला, राज्यात निर्बंध आणखी कडक; रात्री 8 नंतर बाहेर पडल्यास…

वाझेंना अमर्याद अधिकर कोणाच्या आदेशाने ?
अटकेत असलेल्या सचिन वाझे यांचे आता रहस्यमय प्रकरण झाले आहे. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका आणि भरवशाचा असा वाझे फक्त मुंबई पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक आहे. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खरा चर्चेचा विषय आहे. पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करत होता, तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नाही ? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवारांनी राज्यमंत्री भरणे यांची ‘ती’ इच्छा एका क्षणात केली पूर्ण

सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची यंत्रणा नाही
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केले तेव्हा गृह खात्याचे आणि सरकारचे वाभाडे निघाले. मात्र, महाराष्ट्र सरकारचा बचाव करण्यासाठी एकही महत्त्वाचा मंत्री तातडीने पुढे आला नाही. 24 तास गोंधळाचेच वातावरण निर्माण झाले. लोकांना परमबीर सिंह यांचे आरोप सुरुवातीला खरे वाटले याचे कारण सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची कोणतीच यंत्रणा नाही. एका वसुलीबाज फौजदाराचा सुरुवातीला विधिमंडळात बचाव केला. त्यानंतर परमबीर सिंह यांच्या आरोपांना कोणीच उत्तर दिले नाही आणि मीडियाचा ताबा विरोधी पक्षांनी घेतला, हे चित्र भयंकर होते, असेही राऊत यांनी रोखठोक मध्ये म्हटले आहे.

Also Read

अश्लील व्हिडीओ प्रकरणी भाजपचे माजी मंत्री अडचणीत ! तरुणीच्या तक्रारीनंतर FIR दाखल

शशी थरूर यांनी मागितली PM नरेंद्र मोदींची माफी

Bhandup Fire : ‘ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे 12 बळी’; भाजपची टीका

Related Posts