IMPIMP

संजय राठोड यांच्या राजीनाम्याचा निर्णय होतो, मग वाझेंना संरक्षण का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

by amol
devendra fadanvis attacks on government over sachin vaze transfer from crime branch

मुंबई : मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे Sachin Waze यांचे नाव मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांचे निलंबन करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. पण सरकारकडून त्यांची बदली केली आहे. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तत्कालीन वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. त्यावरूनही विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत धारेवर धरले होते. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता संजय राठोड यांना अखेर राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला आणि तो मंजूरही झाला. त्यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. सचिन वाझे यांना सरकार इतकं संरक्षण का देत आहे? संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होऊ शकतो. मग सचिन वाझेंच्या संदर्भात इतकं संरक्षण का मिळतंय. इतकं काय सचिन वाझे यांच्याकडे आहे त्यांना सरकार घाबरतंय.

दरम्यान, राज्य सरकारने दबावाखाली येऊन सचिन वाझेंना Sachin Waze पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना सरकार इतकं संरक्षण का देत आहे, असेही ते म्हणाले. तसेच सचिन वाझे यांच्यावर 201 IPC कलम पुरावे लपवणे या कलमांतर्गत अटक करण्यात यावी, अशी मागणी केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

वाझे यांच्यावर कारवाईच्या मानसिकतेत सरकार नाही

सचिन वाझे Sachin Waze यांच्या बदलीवर आम्ही समाधानी नाही. त्यांचे निलंबन करावे. सचिन वाझेंचे निलंबन होत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सचिन वाझे यांना अटक झाली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मानसिकता सरकारची नाही. सचिन वाझेंना वाचवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव शर्यतीत !

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

“शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाहीत” ! ‘या’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

Related Posts