IMPIMP

काँग्रेसच्या नेत्यानं विचारला फडणवीस अन् दरेकरांना सवाल, म्हणाले – ‘पोलीस एखाद्याला चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत का?’

by Team Deccan Express
devendra fadnavis and pravin darekar rushed to police station congress leader sachin sawant attacks bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे ब्रुक फर्माच्या मालकांना सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. भाजप नेत्यांनी शनिवारी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. विरोधी पक्षाच्या या भूमिकेवर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. पोलीस एखाद्याला चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत का ? एका व्यावसायिकासाठी विरोधी पक्षाचे नेते पोलिसांवर दबाव आणतात हे आश्चर्यकारक आहे, असे प्रश्न उपस्थित करुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत sachin sawant यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘दिल्लीची हुजरेगिरी करुन महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री काय कामाचे ?’

महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना ब्रुक फार्मा कंपनीकेडे तब्बल 20 लाख रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या कंपनीला महाराष्ट्रात इंजेक्शन विकण्याची तातडीने परवानगी देण्यात आली होती. मात्र, कंपनीकडून इंजेक्शन मिळाले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या कंपनीच्या मालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हे समजताच फडणवीस, दरेकर आणि लाड यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

भाजप नेत्यांच्या या वर्तनावर सचिन सावंत sachin sawant यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करुन भाजपवर हल्लाबोल करत प्रश्न उपस्थित केले आहेत. एका व्यावसायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव आणणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांना पाहून आश्चर्य वाटते. पोलिसांचा काय दोष ? रेमडेसीवीरच्या 60 हजार इंजेक्शनचा साठा ब्रुक्स लॅबोरेटीजच्या निर्यातदारांकडे लपवला आहे. त्यासंदर्भातील माहिती लपवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. निर्यात बंदी झाल्यावर CDSCO ला आणि राज्य FDA ला साठ्याची माहिती देणे आवश्यक होते. त्याच अनुषंगाने मुंबई पोलिसांनी कंपनीच्या संचालकाला चौकशीसाठी बोलावले. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोन दिवसांनी तो आला. परंतु त्याच्या मदतीला स्वत: फडणवीस रात्रीच्या वेळी धावले. भाजपचे नेते बिथरल्याचं हे लक्षण आहे, असे सावंत sachin sawant यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोरोना महामारीमध्ये रेमडेसिविरची प्रचंड कमतरता असताना पोलिसांकडून काय अपेक्षा असेल ? चौकशीसाठी ते कोणाला बोलावू शकत नाहीत का ? भाजप नेते जनसामान्यांसाठी अशी पावले उचलतात का ? असा सवाल सचिन सावंत sachin sawant यांनी केला आहे. आपलं कर्तव्य तत्परतेनं बजावणारे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे आणि त्यांच्या पथकाचे जाहीर अभिनंदन, असे ट्विट सावंत यांनी sachin sawant केले आहे.

Also Read :

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

Related Posts