IMPIMP

Devendra Fadnavis | ‘ओबीसी आरक्षणावर ठाकरे सरकारमध्ये बोलके पोपट रोज बोलतात’

by bali123
Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis on obc reservation he slam mahavikas aghadi

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)  भारतीय जनता पक्षाकडून (BJP) महाराष्ट्रात ओबीसी जागर (OBC reservation) अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. या शुभारंभावेळी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मार्गदर्शन केले. त्यादरम्यान बोलताना फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, त्यावेळी मी पुढची 25 वर्ष भाजपमध्ये काम करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीनी (Devendra Fadnavis) स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

‘समाजातील जे वर्ग उपेक्षित हते अशा लोकांना महत्त्वाची खाती पंतप्रधान मोदी यांनी दिलं आहे.
मोदींनी सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी OBC आयोगाला संवैधनिक दर्जा दिला.
OBC समाज करता मोठ्या योजना सुरू झाल्या.
अनेक महामंडळाची निर्मिती आमच्या सरकारच्या काळात झाली.
सर्व समाजाला संधी दिल्या शिवाय सर्व देशाचा विकास करता येत नाही हे आमचे ब्रीद वाक्य आहे. OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर हे लोकं खोटे बोलतात.
यांचे बोलके पोपट रोज बोलतात, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर (Thackeray government) निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘आमच्या काळात पन्नास टक्क्यांच्या वरचे आरक्षण टिकलं होतं. या सरकारच्या काळात या सरकारला जे करायचे होते ते केले नाही.
यांनी एक प्रतिज्ञापत्र दिले असते तर सुप्रीम कोर्टाने हवा तेवढा वेळ दिला असता, असं म्हणत फडणवीसांनी OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले.
तसेच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचला तर लक्षात येते की यांनी काहीच न केल्याने सर्वच आरक्षण गेले.
जे काम आम्ही इतके महिने घसा फोडून सांगत होतो तेच आता करत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आता काही लोक म्हणतात मी खोटं बोलतो. पण आरक्षण (Reservations) महाराष्ट्राला गेले.
आता उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या. तिथे आरक्षण मिळाले.
त्यामुळे हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरती लागू झाला, इतकच काय तर काही गावांनी एका दिवसात डाटा दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
तर 2दिवसांपूर्वी फडणवीस आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भेट झाली.
या भेटीत OBC आरक्षणावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
परवा भुजबळ माझ्याकडे आले होते. मी त्यांना सांगितले की हा माझ्यासाठी राजकीय विषय नाही.
हवी ती मदत करेल. तुमच्या नेतृत्वात करूया, असं ते म्हणाले. दरम्यान, ‘आमची मागणी आहे फेब्रुवारीपर्यंत सर्व गोष्टी झाल्या पाहिजे.
आम्ही पाचही जिल्ह्यात केवळ OBC जागा देऊ. भाजप ओबीसींना आरक्षण परत मिळेपर्यंत थांबणार नाही, असे देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

Web Title : Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis on obc reservation he slam mahavikas aghadi

Related Posts