IMPIMP

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केली ‘ही’ कळकळीची विनंती

by bali123
Devendra Fadnavis | no advertisements hoardings celebrations on devendra fadnavis birthday appeals on 22nd july

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना कळकळीची विनंती केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस (Birthday) आहे. त्यामुळे फडणवीस यांनी यंदाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठेही जाहिरात, होर्डिंग्स, उत्सव नको असल्याचं विनंती करत सांगितलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक आवाहन केलं आहे. ते म्हणाले, ‘यंदाच्या वाढदिवसाच्या (Birthday) निमित्तानं पक्षाचे कोणत्याही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी होर्डिंग, बॅनर लावू नये असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे. तसेच, वर्तमानपत्रे, टीव्हीच्या माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करु नयेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे (BJP) समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. म्हणून ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन देखील भाजप पक्षातर्फे करण्यात आलं आहे.

या दरम्यान, भाजपा (BJP) पक्षाकडूवून असं सांगण्यात आलं आहे की, होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल.
म्हणून या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. असं म्हटलं आहे.

Web Title :- Devendra Fadnavis | no advertisements hoardings celebrations on devendra fadnavis birthday appeals on 22nd july

Related Posts

Leave a Comment