IMPIMP

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्राला मध्य प्रदेशच्या आधी OBC आरक्षण मिळू शकलं असतं, कारण..’

by nagesh
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis criticize mva government over obc reservation in delhi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Devendra Fadnavis on Thackeray Government | ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) टीका होताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. ‘ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राला मध्य प्रदेशच्या आधी न्याय मिळू शकला असता,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ‘त्याचबरोबर मध्य प्रदेश सरकारने केलं ते आम्ही दोन वर्षापासून करायला सांगत असल्याचं,’ फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis on Thackeray Government)

पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”महाराष्ट्राला ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेशच्या आधी न्याय मिळू शकला असता, कारण मध्य प्रदेशने जे केलं ते करा म्हणून आम्ही मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र सरकारला सांगत आहे. मात्र, राज्य सरकारने केवळ टाईमपास केला. कमिशन तयार केलं, त्याला पैसे दिले नाहीत.” असं ते म्हणाले.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कमिशनने स्वतः सांगितलं की आम्हाला एक पैसा दिला नाही, स्टाफ दिला नाही. त्यामुळे मध्य प्रदेशने जो अहवाल सहा महिन्यात तयार केला तो महाराष्ट्राला दोन वर्षे तयार करता आला नाही. न्यायालयाने कालही हेच सांगितलं की महाराष्ट्रासह ज्या राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे त्या राज्यांनी अहवाल तयार करावा आणि ओबीसी आरक्षण द्यावं,” असं ते म्हणाले.

Web Title : Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis criticize mva government over obc reservation in delhi

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | संतापजनक ! अल्पवयीन मुलाचा 23 वर्षाच्या दिव्यांग मुलीवर बलात्कार

Nana Patole on Aditya Thackeray | नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘आमच्या गुडलकमुळेच तुम्ही सत्तेत आहात’

Maharashtra Police Recruitment 2022 | महाराष्ट्रात लवकरच 7 हजार पदांसाठी पोलीस भरती

Related Posts