IMPIMP

Devendra Fadnavis | DGIPR अधिकार्‍यांच्या इस्त्रायल दौरा कशासाठी? फडणवीस म्हणाले…

by bali123
Devendra Fadnavis | pegasus spyware row bjp leader devendra fadnavis reaction dgipr delegation israel visit

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री, न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन पेगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाचा (Pegasus spyware technology) वापर करून हॅक होत असल्याची माहिती समोर आली असून यामुळे देशातील राजकारण चांगलेच ढवळून निघत आहे. या. तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील नेत्यांचे फोनदेखील हॅक (Phone hack) केले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील (MVA) नेत्यांनी मोदी सरकारवर (Modi government) केले आहेत. एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना मंत्रालयाच्या माहिती आणि जनसंपर्क खात्यातील पाच अधिकारी इस्रायलमध्ये गेल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

माध्यमविषयक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षण आणि अभ्यासासाठी डीजीआयपीआरच्या (DGIPR) अधिकारी यांचा इस्रायल (Israel) दौरा आयोजित करण्यात आल्याचं पत्र व्हायरल झालं आहे. हे पत्र इस्त्रायल दूतावासाचे आहे. सप्टेंबर 2019 मध्ये हा दौरा नियोजित होता. मात्र हा दौरा प्रत्यक्षात नोव्हेंबर 2019 मध्ये झाला. तत्कालीन सचिव ब्रिजेश सिंह (Brijesh Singh) यांना या दौऱ्यासंदर्भातलं इस्त्रालयच्या मुंबईतील दूतावासाकडून पाठवण्यात आलेलं पत्र (Letter) समोर आलं आहे.

या गोष्टींचा अभ्यास

या पत्रात इस्रायलमध्ये डीजीआयपीआरचं शिष्टमंडळ कोणत्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे त्याची यादी आहे. त्यात सरकारी जनसंपर्काचे नवीन ट्रेंड्स समजून घेणे, वेब मीडिया (Web media) वापराचे नवे मार्ग अभ्यासणे, डिजीटल मार्केटिंग (Digital marketing), मध्यमांचा वापर, स्मार्ट सिटीमध्ये सरकारी जनसंपर्क यंत्रणेची भूमिका (Smart City), सायबर क्राईम (Cyber Crime) आणि सायबर सेक्युरिटीसंदर्भात नागरिकांना प्रशिक्षित करणे, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांचा वापर करणे अशा विषयांचा समावेश आहे.

फडणवीस यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण

या दौऱ्यासंदर्भात अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या कार्यालयाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आल आहे. मीडियातील बेस्ट प्रॅक्टिसेसच्या अभ्यासा संदर्भात डीजीआयपीआरचा इस्रायल दौरा होता. 16 नोव्हेंबर 2019 रोजी हा दौरा सुरू झाला. हा दौरा ज्यावेळी झाला त्यावेळी राज्यात सरकार अस्तित्वात नव्हते.

बुधवारी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी जसे नेहमी दौरे आयोजित केले जातात.
तसेच डीजीआयपीआरतर्फे मीडिया बेस्ट प्रॅक्टिसेसच्या अभ्यासासंदर्भात होता हा दौरा होता असे देवेंद्र फडणवीस यांना सांगायचे होते,
असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Web Title : Devendra Fadnavis | pegasus spyware row bjp leader devendra fadnavis reaction dgipr delegation israel visit

Related Posts

Leave a Comment