IMPIMP

बेळगावचे उमेदवार शेळके यांनी फडणवीसांना म्हटले ‘महाराष्ट्रद्रोही’

by nagesh
devendra fadnavis proved himself traitor maharashtra says subham shelke

बेळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन – ‘आमच्याविरोधात प्रचारासाठी जे बेळगावात आले त्यांनी स्वत:ला महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध केले असा टोला महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला. कर्नाटकात मराठी माणसांची गळचेपी होते, असेही शेळके यांनी सांगितले.

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश अंगडी यांचे निधन झाले होते. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक अशी प्रमुख लढत होत आहे. त्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना शुभम शेळके म्हणाले, की ‘कर्नाटकात मराठी माणसांची गळचेपी होत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान आणि भगव्या झेंड्याची विटंबना होत आहे. त्यामुळे येथील सरकारविरोधात मराठी माणसांमध्ये चीड आहे. महाराष्ट्रात सामील होणे हेच आमचे ध्येय आहे. ज्यावेळी महाराष्ट्रात फडणवीस सरकार होते तेव्हा आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साडेचार वर्षे लागली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडून Devendra Fadnavis आम्हाला अपेक्षा नाहीत’.

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

काँग्रेस, भाजपला देणंघेणं नाही
बेळगाव प्रश्नाशी काँग्रेस आणि भाजपला देणंघेणं नाही. हा प्रश्न काँग्रेसने उभा केला आहे. लाल-पिवळ्या झेंड्याचा वचपा काढण्यासाठी भगवा झेंडा फडकवणे ही संधी निवडणुकीच्या माध्यमातून मराठी माणसाला मिळाली आहे. जोपर्यंत सीमावासियांचा प्रश्न सुटत नाही, त्यांच्यावरील अन्याय थांबत नाही तोपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समिती शर्थीचे प्रयत्न करणार आहे, असेही शेळके यांनी सांगितले.

Also Read :

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

Related Posts